सातपुडय़ातील 20 गावे स्मशानभूमीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:29 PM2017-08-25T13:29:47+5:302017-08-25T13:30:35+5:30

चोपडा : तापी काठावरील काहीगावांमध्ये स्मशानभूमीत जायला रस्ता नाही

20 village without a cremation ground | सातपुडय़ातील 20 गावे स्मशानभूमीविना

सातपुडय़ातील 20 गावे स्मशानभूमीविना

Next
ठळक मुद्देपावसाळ्यात  नातेवाईकांना कठीण परिस्थितीचा सामना प्रशासनानेही याकडे गांभीर्याने बघितले नाही

ऑनलाईन लोकमत / संजय सोनवणे

चोपडा, जि. जळगाव, दि. 25 - स्वातंत्र्याच्या  70 वर्षानंतरही चोपडा तालुक्यातील  आदिवासी भागातील जवळपास 20 गावांमध्ये स्मशानभूमीची साधी सोय उपलब्ध नसल्याची बाब समोर आलेली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या या गावांना नागरिकांना ‘अंतिम’ संस्कारासाठी हक्काची थोडी जागा देण्याचे औदार्य प्रशासनाने दाखविलेले नाही. त्यामुळे वरील गावातील नागरिकांना उघडय़ावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. विशेषत: पावसाळ्यात  नातेवाईकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो.
पृथ्वीतलावर जन्माला आलेला प्रत्येक माणूस कधी ना कधी मरण पावणारच. त्यामुळे मृत्यूनंतर त्याच्या आयुष्यातील शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्काराचा विधी तरी चांगल्या वातावरणात पार पडावा अशी सर्वाची रास्त अपेक्षा असते. मात्र चोपडा तालुक्यातील 112 गावांपैकी आदिवासी भागातील 20 गावे, तसेच काही पाडय़ांवर स्मशानभूमीचे बांधकामच झालेले नाही. संबंधित गावाच्या ग्रामपंचायतींना हा प्रश्न सोडविता आलेला नाही. 
गावात स्मशानभूमीच नसल्याने, अनेकदा इतर कुणाच्या जागेत अथवा नदी-नाल्याकाठी अंत्यसंस्कार उरकावे लागतात. 
गावाचा ‘कारभार’ पाहणा:या ग्रामपंचायत, किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनानेही याकडे गांभीर्याने बघितले नाही, हे दुदैवच म्हणावे लागेल.
 तसेच तालुक्यातील काही गावांमध्ये अंत्यविधीसाठी स्मशान भूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याचे चित्र आहे. तापी काठावरील गावांमध्ये अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्यांना चिखल तुडवत जावे लागते.म्हणून शासन स्तरावर ज्या गावांमध्ये अजूनही स्मशान भूमी नाही व ज्या गावांमध्ये स्मशान भूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही अश्या गावांसाठी ग्रामपंचायतींना मिळणारा 14 वित्त आयोगात आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे.

या गावात स्मशानभूमी नाही
सत्रासेन, उमर्टी, शेंदणी, मुळ्यावतार, मेलाणे, मालापूर, कुंडय़ापाणी, कृष्णापूर, खा:यापाडा, कर्जाणे, देव्हारी, देवङिारी, बोरमळी, अंमलवाडी, अजंतीसीम, कुंडय़ापाणी, वैजापूर, बोरअजंटी, मोरचिडा, उत्तमनगर व काही पाडे.

चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतातील गावांमध्ये स्मशानभूमीचे बांधकाम झालेले नाही. मात्र अधिकृत माहिती ग्रामसेवकाकडून घ्यावी लागेल. 
                           - डी.आर.डोके, शाखाअभियंता, पंचायत समिती चोपडा

Web Title: 20 village without a cremation ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.