२२ हजार वाहनधारकांनी ना नियम पाळला, ना दंड भरला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:16 AM2021-02-13T04:16:46+5:302021-02-13T04:16:46+5:30
जळगाव : अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी वाहनधारकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. वाहनधारक नियम पाळतात की नाही याची पडताळणी व कारवाई ...
जळगाव : अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी वाहनधारकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. वाहनधारक नियम पाळतात की नाही याची पडताळणी व कारवाई करण्याची प्रमुख जबाबदारी शहर वाहतूक शाखेचे आहे. या शाखेने जिल्हाभरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या ५० हजार ८५५ वाहनांवर कारवाई केली असून त्यांना १ कोटी १३ लाख ४० हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी १२ हजार ९७६ वाहनधारकांनी ३१ लाख ८८ हजार रुपयांचा दंड भरला आहे, तर २२ हजार ३१५ वाहनधारकांनी नियमही पाळला नाही व दंडही भरलेला नाही. त्यांच्याकडे ८१ लाख ५२ हजार ३०० रुपये इतका दंड थकीत आहे.
शहर वाहतूक शाखेतर्फे सर्वाधिक केसेस या विना परवाना वाहन चालविणे, सीट बेल्टचा वापर न करणे, नो पार्कींगमध्ये वाहन पार्कींग करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर करण्यात आलेल्या आहेत. त्याशिवाय अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ३३१ वाहनांवरही कारवाई करण्यात आलेली असून त्यांच्याकडून ४ लाख २७ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देवीदास कुनगर यांनी दिली. दरम्यान, वाहन परवाना निलंबित करण्यासह २०१९ मध्ये ११७ वाहनांचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात आला आहे.
पाच जणांचा परवाना रद्द होणार
वाहतूक नियमांचे उल्लंघन करुनही त्याचा दंड न भरणाऱ्या तसेच वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच जणांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची शिफारस वाहतूक शाखेकडून आरटीओकडे करण्यात आलेली आहे. २०१९ मध्ये अशा २० जणांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
कोट...
वाहनधारकाने नियमाचे उल्लंघन केले तर जागेवर दंड घेण्यासह संबंधिताकडे पैसे नसले तरी त्याच्यावाहनावर कारवाई करुन ती व्यक्ती नंतर राज्यात कुठेही दंड भरु शकते. दंड भरायला उशीर होत असला तरी तो कधी ना कधी भरावाच लागतो, त्याशिवाय त्या वाहनाची विक्री, खरेदी व इतर व्यवहार करता येत नाही.
-देवीदास कुनगर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
अशी आहे आकडेवारी
नो पार्कींग : १६८८
नो पार्कींग पेंडींग : ७५७१
धोकादायक : २४२
वाहन : ५५३
ट्रीपल सीट : ७०४
: १७०४
विना परवाना :३८६८
:२९४८
मोबाईलवर : ९८०
बोलणे : १२१५
अधिक वेग : ३९७
:३७०८
२०२०
कारवाई : ५०८५५
दंड : १,१३,४०३००