पारोळा तालुक्यात २४ अंगणवाड्यांना स्वत:चे छत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:28+5:302021-08-28T04:20:28+5:30
ग्रामीण भागातील शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या संस्था म्हणजे अंगणवाडी होय; मात्र या अंगणवाड्यांचीच दुरवस्था ठिकठिकाणी दिसून येते. तालुक्यात १० अंगणवाड्या ...
ग्रामीण भागातील शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या संस्था म्हणजे अंगणवाडी होय; मात्र या अंगणवाड्यांचीच दुरवस्था ठिकठिकाणी दिसून येते.
तालुक्यात १० अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत, ५ अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या इमारतीत,२ अंगणवाडी ग्रामपंचायतीच्या खोल्यांमध्ये, १अंगणवाडी समाज मंदिरावर,४ अंगणवाडी एकत्रित इमारतीत भरतात. जल जीवन मिशन योजनेंतर्गत सर्व अंगणवाड्यांना १०० टक्के पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे ग्रामपंचायतींना बंधनकारक आहे; पण तालुक्यात ३२ अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देण्यात आले नाही.
यात जामदा व पुनगाव या गावांना पाणी पुरवठा योजनाच नसल्याने नळ कनेक्शनचा संबंध येत नाही. मग उर्वरित ३० अंगणवाडींना जलजीवन योजनेत नळ कनेक्शन देणे बंधनकारक असताना पाणी पुरवठासाठी नळ कनेक्शन का देण्यात आले नाही? हे मात्र कळून आले नाही. ज्या ठिकाणी नळ कनेक्शन नाही तेथील अंगणवाडी सेविका व मदतनीस हे हॅण्डपंप व सार्वजनिक नळांना येणाऱ्या पाण्यातून पाणी आणले जाते.