२८ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 08:24 PM2021-01-07T20:24:58+5:302021-01-07T20:25:06+5:30

मुक्ताईनगरात हळहळ : गेल्या तीन वर्षांपासून जळगावात होता रहिवास

28-year-old dies of heart attack | २८ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

२८ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

Next
क्ताईनगर : शहरातील तहसीलरोडलगत रहिवासास असलेल्या परंतु तीन वर्षांपूर्वी जळगाव येथील शिवम नगरात रहिवासास गेलेल्या एका २८ वर्षीय युवकाचा ६ जानेवारी रोजी अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद मृत्यू झाला.वृत्त असे की , शहरातील तहसीलरोडलगत रहिवासास परंतु तीन वर्षांपूर्वी जळगाव येथील चंदूअन्ना नगरजवळील शिवमनगरात रहिवासास गेलेल्या शिक्षिका विद्या साहेबराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा विवेक साहेबराव पाटील या तरुणाच्या ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजे दरम्यान अचानक छातीत दुखायला लागल्याने त्याला जळगाव येथील क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु हृदयविकाराचा झटका जोरदार होता की उपचार सुरू असतानाच विवेकची प्राणज्योत मालवली.

Web Title: 28-year-old dies of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.