प्रदीप रायसोनींसह ९ जणांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:08 PM2019-11-27T22:08:11+5:302019-11-27T22:08:29+5:30
जळगाव : घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर नाशिक कारागृहात असलेले माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्यासह ९ आजी, माजी नगरसेवकांना मुंबई ...
जळगाव : घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर नाशिक कारागृहात असलेले माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्यासह ९ आजी, माजी नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. गुरुवारी त्यांची कारागृहातून सुटका होऊ शकते. दरम्यान, याआधी २० नोव्हेंबर रोजी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना वैद्यकिय कारणास्तव तीन महिन्यासाठी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या अपीलावर पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
बुधवारी जामीन झालेल्यांमध्ये साधना कोगटा, अलका नितीन लढ्ढा, सुधा पाडूरंग काळे, लता रणजीत भोईटे, मीना अनिल वाणी, विजय पंडीतराव कोल्हे, प्रदीप ग्यानचंद रायसोनी व महेंद्र तंगू सपकाळे यांचा समावेश आहे. पुष्पा पाटील यांचा जामीन नियमित केला. राजा मयुर, मेजर नाना वाणी व पी.डी.काळे यांचा जामीन अद्याप मंजूर झालेला नाही. सरकारतर्फे अॅड.प्रवीण चव्हाण यांनी कामकाज पाहिले.
घरकूल प्रकरणात धुळे जिल्हा न्यायालयाने सुरेशदादा जैन यांच्यासह ४७ जणांना दोषी ठरवून वेगवेगळी शिक्षा सुनावली आहे. या सर्व आरोपींनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, त्याची बुधवारी सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे झाली. न्यायालयाने अटीशर्तीवर ९ जणांना जामीन मंजूर केला. दरम्यान,सुरेशदादांच्या अपीलावर पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे