बळीराम पेठेत ३० जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:15 AM2021-04-06T04:15:49+5:302021-04-06T04:15:49+5:30
शिबीर : लोकमतच्या वृत्तानंतर दाते सरसावले लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रक्त पेढ्या ऑक्सिजनवर असल्याचे वृत्त ''लोकमत'' ने ...
शिबीर : लोकमतच्या वृत्तानंतर दाते सरसावले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रक्त पेढ्या ऑक्सिजनवर असल्याचे वृत्त ''लोकमत'' ने प्रकाशित केल्यानंतर बळीराम पेठेतील तीस तरुणांनी रक्तदान केले. त्यानंतर या पिशव्या माधवराव गोवळकर स्वयंसेवी रक्त पेढीकडे सुपूर्द केल्या.
कोरोनामुळे नागरिकांनी रक्तदान करण्याकडे पाठ फिरवली असून, परिणामी शहरातील रक्त पेढ्यांमध्ये चार दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. आता तर लसीकरणामुळे रक्ताचा अधिकच तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त ''लोकमत'' ने प्रकाशित केल्यानंतर बळीराम पेठेतील शिवसेना शाखा व आझाद क्रिडा सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे नुकतेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात ३० तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यासाठी शिवसेना विभागप्रमुख विपीन पवार, सामाजिक कार्यकर्ता जितु बागरे, जितेंद्र गवळी ,निर्भय पाटील, अक्षय पिगंळे, गजानन परदेशी आदींनी सहकार्य केले.