जळगावमधील तांबापुरात शॉटसर्कीटमुळे लागलेल्या आगीत ३० हजाराची रोकड जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 08:49 PM2017-11-03T20:49:51+5:302017-11-03T20:50:28+5:30
तांबापुरा परिसरातील संतोषी माता मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी दहा वाजता फिरोज खान रमजान खान यांच्या घरात शॉर्ट सर्कीट होऊन अचानक आग लागली. या आगीत घरातील ३० हजार रुपयाच्या रोकडसह संपूर्ण वायरींग, ए.सी. सोफा सेट, लॅपटॉप, घरगुती सामान, कपडे आदी साहित्य जळून खाक झाले. यात साधारण अडीच लाखाच्यावर नुकसान झाले आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,३ : तांबापुरा परिसरातील संतोषी माता मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी दहा वाजता फिरोज खान रमजान खान यांच्या घरात शॉर्ट सर्कीट होऊन अचानक आग लागली. या आगीत घरातील ३० हजार रुपयाच्या रोकडसह संपूर्ण वायरींग, ए.सी. सोफा सेट, लॅपटॉप, घरगुती सामान, कपडे आदी साहित्य जळून खाक झाले. यात साधारण अडीच लाखाच्यावर नुकसान झाले आहे.
फिरोज खान हे संतोषी माता मंदिराजवळ प्लॉट क्र.२६ मध्ये कुटुंबासह राहायला आहेत. वरच्या मजल्यावर रहिवास तर तळमजल्यावर हॉटेलचा व्यवसाय आहे. शुक्रवारी सकाळी फिरोज हे भाजी बाजारात खरेदीसाठी गेले होते तर पत्नीही कामानिमित्त बाहेर गेली होती. लहान मुलगी व आई घरी असताना अचानक शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली. हा प्रकार पाहून फिरोज खान यांच्या आई घाबरल्या. नातीला घेऊन ते तातडीने खाली आले. लोकांना आगीची माहिती दिली. गल्लीतील लोकांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझवत असतानाच फिरोज खान घरी आले. त्यांनीही लोकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले.
कष्टाची कमाई गेली
रात्रंदिवस हॉटेलवर थांबून मेहनतीने कमावलेले ३० हजार रुपये या आगीत जळून खाक झाले. अन्य वस्तूही जळाल्या आहेत. सुदैवाने हॉटेलपर्यंत ही आग पसरली नाही. अग्निशमन दलाचा बंब पोहचण्याआधीच आग विझविण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अक स्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.