शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
7
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
8
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
9
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
10
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
11
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
12
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
13
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
14
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
16
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
17
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
18
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
19
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
20
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"

६५ हजार शेतकरी राहणार पीक विम्याच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 5:44 PM

नुकसानीबाबत मुदतीत तक्रार नाही: अजूनही आॅनलाईन तक्रार पाठविण्याची बळीराजाला संधी

जळगाव : प्रधानमंत्री फसल विमा योजनेत खरीप हंगामात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील १ लाख १ हजार ४०३ शेतकऱ्यांपैकी केवळ ३६ हजार ३८७ शेतकऱ्यांनीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार नियमानुसार ४८ तासांच्या आत कंपनीकडे दिली आहे.त्यामुळे उर्वरीत ६५ हजार १६ शेतकरी पीकविम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचीत राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या शेतकºयांना तक्रार करण्याची आणखी एक संधी असल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.प्रधानमंत्री फसल विमा योजना २०१९ मध्ये खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख १ हजार ४०३ शेतकरी सहभागी झाले होते.त्यासाठी त्यांनी स्वत: १८ कोटी ८८ लाख ३१ हजार १८२ रूपये तर उर्वरीत हिस्सा केंद्र व राज्य शासनाने भरला होता.त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख १२ हजार १२६ हेक्टरचा ३९३ कोटी ७१ लाख ३८ हजार ५१९ रूपयांचा विमा उतरविण्यात आला होता.केवळ ३६ हजार ३८७ शेतकºयांकडून तक्रारजिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेला आहे. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास विमा धारकांनी ४८ तासांच्या आत त्याबाबत तालुका कृषी अधिकाºयांकडे लेखी अथवा विमा कंपनीकडे ई-मेलवर तक्रार करणे बंधनकारक असते. त्यानुसार केवळ ३६ हजार ३८७ शेतकºयांनीच तक्रार केली आहे. त्यामुळे उर्वरित ६५ हजार १६ शेतकरी विमा कंपनीकडून भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यांना शासना५उ४ी नुकसान भरपाईचा लाभ मात्र मिळू शकेल. दरम्यान गुरूवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उर्वरीत शेतकºयांना नुकसानीची तक्रार देण्याची आणखी एक संधी असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.तालुकानिहाय विमाधारक शेतकरीजळगाव - १९९७भुसावळ - ५३१बोदवड - १९३८यावल - १८८१रावेर - १०८६मुक्ताईनगर- २१४१अमळनेर - २८३६२चोपडा - ८३७७एरंडोल - ३४९२धरणगाव - ६४६६पारोळा - १३२४९चाळीसगाव- ६३५४जामनेर - १८३३३पाचोरा - ४११३भडगाव - ३०८३

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव