जिल्ह्यातील ४३ शिक्षक ‘गुणवंत शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:21 AM2021-08-27T04:21:59+5:302021-08-27T04:21:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रसेवा दल, शिक्षक भारती तसेच छात्र भारती व लोकसंघर्ष मोर्चा यांची संयुक्त बैठक ...

43 teachers from the district honored with 'Meritorious Teacher Award' | जिल्ह्यातील ४३ शिक्षक ‘गुणवंत शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित

जिल्ह्यातील ४३ शिक्षक ‘गुणवंत शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राष्ट्रसेवा दल, शिक्षक भारती तसेच छात्र भारती व लोकसंघर्ष मोर्चा यांची संयुक्त बैठक बुधवारी कांताई सभागृहात पार पडली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक ४३ शिक्षकांचा शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

अध्यक्षस्थानी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे होत्या. याप्रसंगी राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मुंबईत शिक्षकांचा पगार १ तारखेला व राष्ट्रीयीकृत बँकेत होतो व त्यामुळे जळगावातसुद्धा १ तारखेला पगार व्हावा व तो राष्ट्रीयीकृत बँकेत व्हावा यासाठी शिक्षक भारती संघटनेचा प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यामुळे सह्यांची मोहीम राबवून नारायण वाघ यांना सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. त्यानंतर शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी वैचारिक पुरोगामी विचारसरणीच्या संघटना एकत्र करून शिक्षकांचे सर्व समस्या कशा सोडविता येतील यावर वैचारिक प्रकाश टाकला, तर प्रतिभा शिंदे यांनी राष्ट्र सेवा दल, शिक्षक भारती, छात्र भारती लोकसंघर्ष मोर्चा एकत्र करून शिक्षकांच्या प्रश्नांवर जोरदार संघर्ष करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली. प्रास्ताविक सोमनाथ पाटील यांनी, तर सूत्रसंचालन नारायण आनंदा वाघ यांनी केले. आभार विनोद चव्हाण यांनी मानले.

यांची होती होती उपस्थिती

यावेळी बैठकीमध्ये जालिंदर सरोदे, प्रकाश शेळके, राष्ट्रसेवा दलाचे अशोक पवार, छात्र भारतीचे सचिन बनसोडे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. यावेळी करीम सालार, भारती गाला तसेच अशपाक खाटिक, नूर खान, भरत शेलार, आप्पासाहेब पाटील विनोद रोकडे, लालाजी नांद्रे, आर.जे. पाटील यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सुनीता पाटील, अजय पाटील, प्रभात तडवी, रणजित पाटील, संदीप पाटील, प्रवीण पाटील, सुनील माळी, रवींद्र पाटील, सुशील पाटील, नीलेश इंगळे, किशोर पाटील, विनोद नाईक, पंकज गरूड, सुनील बोरसे, प्रवीण चौधरी, विलास पाटील, चंद्रकांत देशमुख, विजय सोनवणे, संजय पाटील, विशाल वाघ, आर.के. पाटील, संजय वानखेड, शेखर पाटील, अमोल वाणी, पंकज पाटील, विवेक सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

गुणवंत शिक्षक पुरस्काराने यांचा झाला सन्मान

- प्राथमिक विभाग : कल्पना अहिरे, शैलेश गिरासे, भय्यासाहेब राणे, ज्ञानेश्वर पाटील, पद्माकर गोसावी, नलिनी पाटील, जयवंत खैरनार, मनीषा शिरसाठ, अरुणा तडवी, समाधान बोरसे, अनिल बराडे, भाग्यश्री लोहार, संदीप माळेकर, रमेश राठोड, गणेश सनान्से, राहुल वाणी, पद्माकर चौधरी, स्वाती पाटील, पूनम सोनवणे, संगीता बागुल, रिजवान खान अजमल खान, इफ्फत फातेमा अन्सार अहमद शेख.

- माध्यमिक विभाग : श्रावण तेले, श्यामकांत बर्डीकर, प्रसन्न खंडाळे, रवींद्र पाटील, मीना बडगुजर, सुशांत जगताप, बाळू धाडी, कल्पना देवरे, शरद जगताप, उज्ज्वला देशमुख, नाना पाटील, किरण पाटील, सचिन सूर्यवंशी, नितीन माळी, सचिन ठाकूर, निलांगी पाटील, शाह झाकीर अमनुल्लाह, सय्यद युनुस, प्रतिभा पाटील, वैशाली झोपे, मनोहर पाटील.

Web Title: 43 teachers from the district honored with 'Meritorious Teacher Award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.