कोरोनाकाळातही खान्देशात ४५ हजार नवीन वीजजोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:15 AM2021-04-05T04:15:25+5:302021-04-05T04:15:25+5:30

महावितरण : सर्वाधिक २६ हजार वीजजोडण्या जळगाव जिल्ह्यात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या काळातही गेल्या वर्षभरात महावितरणकडून खान्देशात ...

45,000 new power connections in Khandesh even during Corona period | कोरोनाकाळातही खान्देशात ४५ हजार नवीन वीजजोडण्या

कोरोनाकाळातही खान्देशात ४५ हजार नवीन वीजजोडण्या

Next

महावितरण : सर्वाधिक २६ हजार वीजजोडण्या जळगाव

जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या काळातही गेल्या वर्षभरात महावितरणकडून खान्देशात ४५ हजार १७४ नवीन वीजजोडण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक विजेच्या २६ हजार ७१७ जोडण्या जळगाव जिल्ह्यात करण्यात आल्या असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

महावितरणकडून दरवर्षी मागणीनुसार साधारणतः ९ ते १० लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मागील वर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याचा वेग मंदावला होता. मात्र, तरीही इतर वीजसेवांप्रमाणेच नवीन वीजजोडण्या देण्याचे कामही महावितरणतर्फे सुरू होते. त्यानुसार, एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत जळगाव परिमंडळात उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील ४५ हजार १७४ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये जळगाव २६ हजार ६१७, धुळे जिल्ह्यात १२ हजार ४५, तर नंदुरबार जिल्ह्यात सहा हजार ५१२ वीजजोडण्यांचा समावेश आहे.

दरम्यान, वीजमीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून उपलब्ध झालेले मीटर तातडीने संबंधित ग्राहकांकडे कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्य कार्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. ग्राहकांना खुल्या बाजारातून नवीन वीजमीटर खरेदी करण्याची आवश्यकता नसल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले.

इन्फो :

वीजजोडणीसाठी ऑनलाइनही अर्ज करता येणार

घरगुती, वाणिज्य, औद्योगिक तसेच कृषी अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांना नवीन वीजजोडणीच्या अर्जासाठी महावितरणची वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्याची अंतर्गत प्रक्रियादेखील ऑनलाइन करण्यात आली आहे. अर्ज केल्यापासून त्याच्या मंजुरीच्या प्रक्रियेतील स्थिती पाहण्यासाठी ग्राहकांना ऑनलाइनही पाहता येणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: 45,000 new power connections in Khandesh even during Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.