५४ टक्के रुग्ण एकट्या जळगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:15 AM2021-03-07T04:15:56+5:302021-03-07T04:15:56+5:30
जळगाव : जळगाव शहरात कोरोना थांबत नसल्याचे गंभीर चित्र कायम जिल्ह्यातील ६१० रुग्णांपैकी ३३४ रुग्ण ५४ टक्के रुग्ण एकट्या ...
जळगाव : जळगाव शहरात कोरोना थांबत नसल्याचे गंभीर चित्र कायम जिल्ह्यातील ६१० रुग्णांपैकी ३३४ रुग्ण ५४ टक्के रुग्ण एकट्या जळगाव शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात मोठे हॉटस्पॉट म्हणून जळगाव शहरच समोर आले आहे. दुसरीकडे चोपडा तालुक्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी काहीसे रुग्ण घटून ६७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहरात सक्रिय रुग्णांची संख्या २००९ वर पोहोचली आहे. नियमित एकट्या जळगाव शहरातच सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, शनिवारी यावल तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष आणि भुसावळ तालुक्यातील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसात सात मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान, शहरात रुग्ण संख्या वाढल्याने त्या दृष्टीने तपासण्यांची संख्याही वाढविण्यात आली असून आता नियमित चारशे ते पाचशेच्या दरम्यान, कोरोना चाचण्या होत आहेत. त्यात बाधितांचे प्रमाण मात्र, वाढले आहे.
काहीसा दिलासा
शुक्रवारपेक्षा अधिक रुग्ण शनिवारी बरे होऊन परतले आहेत. शुक्रवारी २४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. तर शनिवारी ३२७ जण बरे झाले. लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने बरे होणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल, असाही एका कयास लावला जात आहे. सद्य:स्थितीत ३३९० रुग्णांना कसलीही लक्षणे नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पॉझिटिव्हिटी वीस टक्क्यांवर स्थिर
आरटीपीसीआर: २३.५५ टक्के
ॲन्टीजन : १७.०३ टक्के
अहवालांची स्थिती
आरटीपीसीआर चाचण्या : ८६२
ॲन्टीजन चाचण्या : २२८९
आरटीपीसीआरचे आलेले अहवाल : ९३४
कोट
कोरोनाची भीती कमी झाल्याने लोकांमधील गांभीर्य कमी झाले आहे. त्यामुळे लक्षणे असूनही अनेक लोक बाहेर लोकांमध्ये वावरतात, तपासणीसाठी येत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढत आहे. शिवाय ज्यांना कोरोना होऊन गेला ते आपल्याला कोरोना होणार नाही. या गैरसमजात नियम न पाळता फिरतात, मात्र, अशा अनेक रुग्णांना पुन्हा कोरोना होत असल्याची प्रकरणे आहेत. त्यामुळे नियम सर्वानी पाळावे आणि लक्षणे जाणवल्यास विलग होऊन तातडीने तपासणी करावी, तेव्हाच संसर्ग आटोक्यात येईल.
- डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी