जळगाव : आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात २९६ पात्र शाळेत ३ हजार ६५ जागांसाठी ५ हजार ९३९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
आरटीईतंर्गत इंग्रजी शाळांमधील २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश दिला जातो. यंदा २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ३ ते ३० मार्चपर्यंत पालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून आरटीई प्रवेशासाठी ५ हजार ९३९ पालकांनी अर्ज केले आहेत. आता गोरगरिब मुलांना नोंदणीची मुदत संपल्यावर आता ६ एप्रिलला प्रवेशाची लॉटरी काढण्याचे निश्चित होत आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी ३ एप्रिलपर्यंत ''''डुप्लिकेट फॉर्म रिमूव्ह'''' करण्याचे काम पूर्ण करावे. ३ एप्रिलनंतर फॉर्म रिमूव्ह करता येणार नाहीत, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
आता लक्ष लॉटरीकडे
पालकांना अर्ज करण्याची मुदत संपली आहे. आता प्रतीक्षा आहे ती लॉटरीची. लवकरच ती सुध्दा जाहीर होणार आहे. नंतर लॉटरीच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश निश्चित करून घ्यावयाचा आहे. त्याआधी पालकांनी दिलेले कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतरचं प्रवेश निश्चित होणार आहे.
============================================
तर मोठ्या शाळेचे स्वप्नही पाहू शकत नाही....
आरटीईच्या माध्यातून मुलांना चांगले शिक्षण मिळते. स्वप्नातही पाहू शकत नाही, अशा शाळांमध्ये पाल्यास प्रवेश मिळतो. ही प्रक्रिया दरवर्षी राबवावी. जेणे करून गोरगरिबांच्या मुलांना उत्तम व दर्जेदार शिक्षण मिळेल व कुटूंबाची स्थितीही सुधारेल.
- समाधान पाटील, पालक
दरवर्षी हजाराच्यावर आरटीईच्या जागा रिक्त राहतात. या जागा रिक्त राहणार नाही, यासाठी शिक्षण विभागाने पाउल उचलले पाहिजे. शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. मोफत शिक्षण मिळत असल्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात मुलांना आणण्यासाठी रिक्त जागांवर प्रवेश घेणे आवश्यक आहे.
- मुकेश मोरे, पालक
ज्या गावात राहत नाही. मात्र, प्रवेशा पुरता भाडेतत्वावर राहत असल्याचे दाखवून अनेक पालक गोरगरिब विद्यार्थ्यांच्या जागांवर त्यांच्या पाल्यांचे प्रवेश मिळवितात. यामुळे दर्जेदार शिक्षणापासून गोरगरिब कुटूंबातील वंचित राहतो. त्यामुळे पालक प्रत्यक्ष कुठ राहतात, याचीही पडताळणी होणे अपेक्षित आहे.
- पांडुरंग गायकवाड, पालक
जळगाव जिल्ह्यातून ५ हजार ९३९ पालकांनी आपल्या पाल्याच्या आरटीई प्रवेशासाठी अर्ज केले आहे. लवकरच लॉटरी घोषित होणार आहे. लॉटरी निघालेल्या पालकांना संदेश पाठविला जाईल.
- बी.एस.अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
==========================
आरटीईतंर्गत किती शाळांची नोंदणी - २९६
एकूण जागा - ३,०६५
एकूण प्राप्त अर्ज - ५९३९
=============================
तालुका शाळा जागा
अमळनेर १६ १६५
भडगाव २१ १५५
भुसावळ २१ २९१
बोदवड ८ ४१
चाळीसगाव २६ २१५
चोपडा १५ १६१
धरणगाव १५ १३४
एरंडोल २० ९९
जळगाव ग्रामीण २४ २५९
जळगाव शहर ३३ ५४१
जामनेर १२ १२०
मुक्ताईनगर ११ १२५
पाचोरा १८ २६५
पारोळा १६ १३६
रावेर २२ १४०
यावल १८ ११८