मालेगाव येथून आलेले ९४ पोलीस कर्मचारी एरंडोलला क्वॉरंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 12:57 PM2020-05-10T12:57:18+5:302020-05-10T12:57:56+5:30

बंदोबस्त काढला : १५ दिवस थांबावे लागणार

94 police personnel from Malegaon quarantined Erandol | मालेगाव येथून आलेले ९४ पोलीस कर्मचारी एरंडोलला क्वॉरंटाईन

मालेगाव येथून आलेले ९४ पोलीस कर्मचारी एरंडोलला क्वॉरंटाईन

Next

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी मालेगाव पोलिसांच्या दिमतीला पाठविण्यात आलेले जळगावचे पोलीस कर्मचारी शनिवारी जिल्ह्यात परत आले. या पोलीस कर्मचाऱ्यांना थेट शहरात प्रवेश न देता खबरदारी म्हणून एरंडोल येथे १५ दिवसासाठी क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक (गृह) डी.एम. पाटील यांनी ‘लोकमत’ ला दिली.
मालेगाव येथे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने शहराच्या चारही सीमा सील करण्यात आल्या होत्या. मालेगावात एकाही व्यक्तीला प्रवेश दिला जात नव्हता, किंवा येथून कोणाला बाहेर जावू दिले जात नव्हते. कंटेनमेंट झोनमध्ये अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, शहराची लोकसंख्या व वाढते रुग्ण पाहता स्थानिक बंदोबस्त अपूर्ण पडत असल्याने जळगावहून १३ एप्रिल रोजी १०० पोलीस कर्मचारी पाठविण्यात आले होते. या कालावधीत जिल्हा पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.
बंदोबस्त सोडून आलेले ५ कर्मचारी आधीच निलंबित
याच कालावधीत बंदोबस्तातून पळून आलेल्या पाच कर्मचाºयांना पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे, तर आणखी काही कर्मचाºयांची चौकशी सुरु आहे. मालेगावातून परत आलेल्या कर्मचाºयांमध्ये ९१ कर्मचारी तर ३ वाहन चालक आहेत. दुपारी हे सर्व कर्मचारी एरंडोल येथे दाखल झाले. धरणगाव रस्त्यावरील एका शाळेत या कर्मचाºयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या काळात एकाही कर्मचाºयाने ठिकाण सोडू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. १३ एप्रिल ते ८ मे या कालावधीत या कर्मचाºयांनी बंदोबस्त केला.

Web Title: 94 police personnel from Malegaon quarantined Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव