पहिले लग्न झालेले असताना केले दुसरे लग्न; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 04:25 PM2024-12-06T16:25:41+5:302024-12-06T16:26:02+5:30

भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

A case has been registered against seven people for marriage fraud | पहिले लग्न झालेले असताना केले दुसरे लग्न; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पहिले लग्न झालेले असताना केले दुसरे लग्न; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळः पहिले लग्न झालेले असतानाही घटस्फोट झाल्याचे भासवून भुसावळ शहरातील एका २९ वर्षीय महिलेशी लग्न केले. लग्नानंतर झालेला मुलगा दत्तक देण्यासाठी आग्रह करून त्या महिलेचा छळ करीत दागिने हडपल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडितेचा २०१५ मध्ये पहिला विवाह झालेला होता. काही कारणास्तव त्यांचा २०२० मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर सचिन सैदाणे यांच्यामार्फत त्यांचा विवाह शरद सैंदाणे यांच्यासोबत २०२२ साली झाला होता. लग्नानंतर २०२३ साली पीडितेने मुलाला जन्म दिला. शरद सैंदाणे याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला नसताना देखील तसे विवाहितेला भासवून दुसरे लग्न केले. विवाहितेला झालेले मूल हे आशा सैंदाणे यांना दत्तक देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. शिवीगाळ करून मारहाण केली आणि अंगावरील दागिने देखील काढून घेतले. विवाहितेला माहेरी सोडून देत तिची फसवणूक केली म्हणून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संशयित शरद छगन सैंदाणे, छगन महादू सैंदाणे, आशा हर्षल सैंदाणे सर्व (रा. नांदेड, ता. धरणगाव), सुनील सोनवणे, रेखा सुनील सोनवणे, मयूर सुनील सोनवणे (सर्व रा. जामनेर), सचिन सैंदाणे (रा. नांदेड, ता. धरणगाव, ह. मु. पुणे) यांनी यांनी छळ केल्याचे महिलेने म्हटले आहे. मुख्य आरोपी हा गोंदिया येथील पीएसआय आहे. या प्रकरणी पो.नि. महेश गायकवाड तथा पो. हे. कॉ. संजय तायडे हे तपास करीत आहे.

Web Title: A case has been registered against seven people for marriage fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.