शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

चाळीसगाव परिसरात खरिपाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:13 AM

चाळीसगाव : गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने तासभर हजेरी लावल्याने यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. सद्य:स्थितीत हंगामासाठी पूर्व ...

चाळीसगाव : गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने तासभर हजेरी लावल्याने यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. सद्य:स्थितीत हंगामासाठी पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काही भागांत मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली जात आहे. कृषी विभागाने या वर्षी ९० हजार हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वर्षी कपाशीचा पेरा वाढणार असून मक्याची लागवड १० ते १५ टक्क्यांनी कमी होईल.

खरिपाच्या लागवडीसाठी शेती-शिवार सज्ज झाले असून मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या वर्षीही खरिपाच्या लागवडीत कपाशीचाच वरचश्मा राहणार असून मका लागवडीचे क्षेत्र १० ते १५ टक्क्यांनी घटणार आहे. २ लाख ८७ हजार ८५० कपाशी बियाणे पाकिटांचा पेरा केला जाणार आहे. या वर्षी रासायनिक खतांचा १० टक्के कमी पुरवठा होणार असल्याने टंचाई जाणवणार आहे.

गतवर्षीच्या खरिपात मका लागवडीचे क्षेत्र वधारले असले तरी ते कपाशीच्या तुलनेत कमीच होते. यंदाही मका लागवडीचे क्षेत्र आणखी घटणार असल्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. कोरडवाहू व बागायती कपाशीचे क्षेत्र मात्र वाढणार आहे. या वर्षीही बळीराजाची दारोमदार पांढऱ्या सोन्यावरच राहणार आहे.

९० हजार हेक्टरवर बहरणार खरिपाचा हंगाम

चाळीसगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख २१ हजार ९०४ हेक्टर इतके आहे. यापैकी ९० हजार ३१८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा होणे अपेक्षित आहे.

१....मका लागवडीचे क्षेत्र घटणार असले तरी काही प्रमाणात भुईमूग, सोयाबीन पेऱ्याचे क्षेत्र वाढणार आहे.

कांदा लागवडही कमी होण्याची शक्यता आहे.

काळ्या बाजारावर राहणार नजर,

तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

बियाणे, खते आणि कीटकनाशके यात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाची काळ्या बाजारावर करडी नजर राहणार आहे. यासाठी पंचायत समितीमध्ये तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदवू शकतात. भरारी पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

चौकट

खतांची टंचाई जाणवणार, १० टक्के कमी पुरवठा

अनुदानित रासायनिक खतांचा १० टक्के कमी वापर या धोरणानुसार जिल्हास्तरावरून रासायनिक खतांच्या पुरवठ्याचे नियोजन होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासूनच खत टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

• एकूण २८ हजार ३८४ मेट्रिक टन खताची गरज यंदाच्या खरीप हंगामासाठी निर्धारित केली आहे.

.......

महत्त्वाची चौकट

गेल्या वर्षीची बनावट खतांची कारवाई गुलदस्त्यात

बनावट खते, बियाणे व कीटकनाशके देऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसगत केली जाते. हे दरवर्षीचे रडगाणे आहे. गेल्या वर्षी लाखो रुपये किमतीचा बनावट खतांचा साठा चाळीसगावी हस्तगत केला गेला. मात्र त्याबाबत काय कारवाई झाली, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळेच कोरोनाकाळात अगोदरच पिचलेल्या शेतकऱ्यांना बनावट खतांद्वारे लुबाडणूक होण्याची भीती वाटत आहे. कृषी विभागाने अलर्ट राहावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

..........

कृषी विभागाने पीकनिहाय पेऱ्याचे केलेले नियोजन (क्षेत्र : हेक्टरमध्ये)

कपाशी बागायती - २७ हजार २११

कपाशी कोरडवाहू - ३४ हजार ४३७

ज्वारी - १२५८

इतर पिके - ३५५१

उडीद - ९३२

तूर - ५२८

भुईमूग - ८२५

सोयाबीन - १५०

फळबाग - ३००

बाजरी - ३५५१

===Photopath===

290521\29jal_1_29052021_12.jpg

===Caption===

टाकळी प्र.दे - पिलखोड शिवारात मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करताना. (छाया : अमोल सोनार)