काँग्रेसकडून उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 02:28 PM2018-07-13T14:28:23+5:302018-07-13T14:29:55+5:30

मनपा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करीत एका तरुणाने गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गोंधळ घातला.

The accusation of money being taken from Congress for nomination | काँग्रेसकडून उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप

काँग्रेसकडून उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप

Next
ठळक मुद्देजळगावच्या कॉँग्रेस कार्यालयात गोंधळकाँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काढली तरुणाची समजूतवरिष्ठ नेत्याच्या नावाने पैसे घेत केली फसवणूक

जळगाव : मनपा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करीत एका तरुणाने गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गोंधळ घातला. पदाधिकाºयांनी या तरुणाची समजूत काढत शांत केले. मात्र हा वैयक्तिक व्यवहार असून पक्षाशी त्याचा सबंध नसल्याचे पदाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.
मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यासाठी पक्षातील एकाने वरिष्ठ नेत्यांच्या नावाने २२०० रुपये व ३ हजार रुपये घेतल्याचा आरोप एका तरुणाने केला. या तरुणाची कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी व नगरसेवक पदाचे उमेदवार श्याम तायडे यांनी समजूत घातली. या गोंधळानंतर कार्यकर्ते जमा झाले. मात्र काही वेळेत कार्यकर्ते काँग्रेस भवनातून रवाना झाले. दरम्यान, या प्रकरणात पक्षाशी संबध नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले.

Web Title: The accusation of money being taken from Congress for nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.