जळगाव : जिल्हा पेठ पोलिसांच्या तावडीतून पसार झालेले एटीएम लूटणारे निसार शफुर सैफी (३८) आणि त्याचा लहान भाऊ इरफान शफुर सैफी (२९, रा.पलवल, हरियाणा) या दोघांना शोधून काढण्यात हरियाणा पोलिसांना यश आले आहे. फरिदाबाद येथील ट्रान्सपोर्ट नगर भागातून शुक्रवारी रात्री आठ वाजता अटक करण्यात आली.या दोघांनी जिल्हा पेठ पोलिसांना झोपेत ठेवून बुधवारी पहाटे पाच वाजता हरियाणातील बदरपूर येथून पलायन केले होते. या आरोपींना घेऊन गेलेले पथक माघारी फिरले असतानाच ही माहिती मिळाल्यानंतर ते परत हरियाणा रवाना झाले आहेत.जळगावच्या गुन्ह्यातील तपास पूर्ण झाल्यानंतर या आरोपींना परत हरियाणातील फरीदाबादमधील निमका कारागृहात पोहचविण्यासाठी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे शिवाजी पवार, प्रशांत जाधव, हेमंत तायडे व शेखर पाटील हे चार कर्मचारी गेले होते.बुधवारी रात्री एका हॉटेलमध्ये पोलीत झोपले असता दोन्ही आरोपी तिथून पसार झाले होते.
पसार झालेले आरोपी हरियाणात सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 12:48 PM