अमळनेर : पोलिसांनी कोविडचा नियमभंग करणाऱ्या १७९ लोकांवर दंडात्मक कारवाई करून ४३ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ९ दुकाने सील केली आहेत.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी धुळे रोडवर कुलगुरू मंगल कार्यालय, गलवाडे रोड, पैलाड आदी ठिकाणी नाकाबंदी करून तसेच बाजारात गस्त घालून दोन दुकानांना ३ हजार रुपये दंड तर अल्लबक्ष हार्डवेअर जनरल स्टोअर्स, पूनम लेडीज अँड जनरल स्टोअर्स, लक्ष्मी बेंटेक्स अँड ज्वेलरी, विपुल स्टील अँड गिफ्ट आर्टिकल्स, कल्पेश जनरल स्टोअर्स, राज फुटवेअर, चौहान फर्निचर, नानक रेडिमेड, आहुजा, महादेव फुटवेअर या ९ दुकानांना सील लावण्यात आले. ४३ लोकांवर मोटर वाहन कायद्यांव्ये गुन्हा दाखल करून १६ हजार रुपये दंड करण्यात आला. विना हेल्मेट ९ जणांविरुद्ध ऑनलाईन गुन्हे दाखल करण्यात आलेत तर विनाकारण फिरणाऱ्या ११० लोकांवर २०० ते २ हजार रुपये दंड करून कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक हिरे यांना उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल, सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, राहुल लबडे, नरसिंग वाघ व पोलीस कर्मचारी, होमगार्ड कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
===Photopath===
250521\25jal_2_25052021_12.jpg
===Caption===
१७९ लोकांवर कारवाई, ९ दुकानांना सील