लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : नगरपालिका व पोलीस प्रशासनातर्फे अत्यावश्यक सेवा वगळता शनिवारी व रविवारी दुकाने सुरू ठेवणाऱ्या २९ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे, अतिक्रमण विभागप्रमुख राध्येश्याम अग्रवाल, मधुकर पाटील यांचे संयुक्त पथक नेमून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पथकाने शहरात विविध ठिकाणी छापे मारून २९ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
या दुकानदारांवर केली कारवाई
बाबा जनरल, अशोक पाटील, सेवन डेज शॉपी, सिसो मेंन्स वेअर, श्री रिफ्रजेशन, श्रीराम प्रोव्हीजन, बालाजी सलून, गुरुकृपा सेंटर, मुंबई चौपाटी, श्री गणेश नास्ता सीडीएम हॉटेल, भारत मेंस पार्लर, गणेश चायनीज, दिव्या जनरल, यश चायनीज, हेअर मेंस वेअर, आराध्या किराणा, रोहिणी फूट वेअर, स्वादिस्ट नमकिन, फिझा फूट, मानसी गिफ्ट, सुलाई जनरल, आदर्श मेंस पार्लर, श्रीमान अमृततुल्य, ओम प्रोव्हीजन, प्रशांत पाटील यांची दुकाने शनिवारी व रविवारी सुरू असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.