नशिराबाद : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना सुध्दा नशिराबाद येथे काही नागरिकांकडून ही बाब गांभीर्याने घेत नसल्याची स्थिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी बुधवारी नशिराबादच्या आरोग्य केंद्राला भेट देवून पाहणी केली. गावात बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. याबाबत प्रशासनाने उपाययोजनांवर भर दिला असून विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सत्र सुरू केले आहे. आतापर्यंत तब्बल चोवीस जणांवर कारवाई झाली असून सुमारे पाच हजार शंभर रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे यांनी बुधवारी नशिराबादला भेट दिली. यावेळी सरपंच विकास पाटील, उपसरपंच किर्तीकांत चौबे, ग्रामविकास अधिकारी बी़एस़पाटील, मंडळ अधिकारी आशिष वाघ, तलाठी प्रवीण बेंडाळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी चेतन अग्निहोत्री, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. गावात दिवसागणिक वाढत असलेल्या बाधितांची संख्या पाहता गावात उपाययोजनांवर भर देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ताप सर्दी खोकला आदी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी आरोग्य प्रशासनाची त्वरित संपर्क साधावा असे आवाहन केले.दुकानदार, विक्रेत्यांवर कारवाईदरम्यान, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग करीत असलेल्या कार्याचा आढावा व माहिती जिल्हाधिकारी यांनी पाहणीवेळी घेतली व त्यात आढळलेल्या त्रुटीबाबत सूचना केल्या. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी यांनी गावातील प्रमुख मार्गांवर विना मास फिरणाºयांवर कारवाई केली तर विनामास्क दुकानदार व विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. प्रशासनाने अचानक मोहिम राबविल्यामुळे विनामास्क फिरणाºयांवर चपराक बसली आहे.तपशिल नसलेल्यांना नोटीसगावातील खासगी डॉक्टरांनी रुग्णांची तपशीलाची नोंद ठेवावी व त्यात संशयित लक्षण असलेले रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला कळवावी. दरम्यान गावातील काही डॉक्टरांकडे दररोज येणाºया रुग्णांच्या तपशीलाची नोंद नसल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे.
नशिराबाद येथे विना मास्फ फिरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 1:12 PM