ॲक्टिव्ह केसेस दोन हजारांच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:14+5:302021-04-27T04:17:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील नवे रुग्ण कमी आणि बरे होणारे अधिक हे दिलासादायक चित्र कायम असल्याने शहरातील ...

Active cases below two thousand | ॲक्टिव्ह केसेस दोन हजारांच्या खाली

ॲक्टिव्ह केसेस दोन हजारांच्या खाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील नवे रुग्ण कमी आणि बरे होणारे अधिक हे दिलासादायक चित्र कायम असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या अखेर दोन हजारांच्या खाली अर्थात १९५०वर आली आहे. शहरातील २१९ रुग्णांनी सोमवारी कोरोनावर मात केली, तर १५९ रुग्ण आढळून आले आहेत.

शहरातील रुग्णसंख्या सातत्याने २०० पेक्षा कमी नोंदविण्यात येत आहे. मृतांची संख्याही घटली असून, सेामवारी तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. शिवाय अनेक हॉटस्पॉट असलेल्या परिसरात आता कमी रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा आलेख खाली उतरत असल्याचे हे एक दिलासादायक चित्र म्हणता येईल, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, जळगाव ग्रामीणमध्ये नव्या ५३ रुग्णांची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून ग्रामीणमध्ये रुग्णवाढ समोर आली आहे.

अन्य १३ तालुके एक हजाराखाली

जिल्ह्यातील जळगाव व भुसावळ तालुकावगळता अन्य १३ तालुक्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ही एक हजाराच्या खाली आली. यात चोपडा येथील रुग्णसंख्या झपाट्याने कमी झालेली आहे. भुसावळात सध्या १३२५ सक्रिय रुग्ण आहेत, तर जळगाव तालुक्यात २२९३ रुग्ण आहेत. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १०,९११ झाली आहे.

पाचोऱ्यात चार मृत्यू

सोमवारी पाचोरा तालुक्यात सर्वाधिक चार बाधितांचे मृत्यू झाले. यात एका चारवर्षीय मुलीचा समावेश आहे. यासह एरंडोल, जळगाव प्रत्येकी तीन, भुसावळ, जामनेर प्रत्येकी दोन, जळगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भडगाव, धरणगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. यात पाच रुग्ण हे ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

लसीकरणाचा वेग वाढला

जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, केंद्रांवर गर्दी होत आहे. रविवारी प्राप्त २५ हजार डोसनंतर जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले असून, जिल्ह्यात एका दिवसात सोमवारी ९९४९ लोकांनी पहिला, तर ७५०१ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. दरम्यान, कोव्हॅक्सिन लसीचे २४०० डोसेस लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती मिळाली.

नोंदणी आवश्यक

१८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. मात्र, यासाठी आधी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. केंद्रांवरील गर्दी कमी करण्यासाठी ही नोंदणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, १ मेनंतर जिल्ह्याला पुरेसे लसीचे डोस मिळतील, खासगी रुग्णालये स्वत: लस विकत घेऊ शकणार आहेत. त्यामुळे शासनाकडून आलेली लस ही पूर्ण शासकीय केंद्रात लसीकरणासाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Active cases below two thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.