जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात जिल्हा प्रशासनाल तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. शहरातील दोन व भुसावळच्या एकाला पुरवठा करताना जिल्हा प्रशासन सध्या तारांबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सध्या तीन ऑक्सिजन पुरवठादार आहेत. त्यातील एका ऑक्सिजन पुरवठादाराकडील ऑक्सिजन संपला आहे. सध्या जिल्ह्यात जवळपास दररोज तीन ते चार नवे टँकर येत आहे. एका टँकरची क्षमता ही १५ मेट्रीक टन असते. सध्या जीएमसीसह इतर सर्व शासकीय रुग्णालये आणि खासगी कोविड रुग्णालये पकडून जवळपास ५० ते ६० मेट्रीक टन ऑक्सिजन लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन पैकी एका ऑक्सिजन पुरवठादाराकडील साठा हा खुपच कमी होतो. किंवा संपुन जात आहे. त्यामुळे त्याच्याकडे ऑक्सिजनचा पुन्हा साठा पुर्ववत व्हावा, आणि सर्व रुग्णालयांना तो मिळावा, यासाठी प्रशासन तारेवरील कसरत करत आहे. त्यासोबतच प्रशासन शासकीय रुग्णालयांमधील साठा कमी होणार नाही, याची काळजी घेत असल्याचेही समोर आले आहे.
कोट - दररोज तीन ते चार टँकर येत आहेत. रुग्णालयांनी काटकसरीने ऑक्सिजन वापरल्यास दैनंदिन पुरवठा नियोजन करणे व्यवस्थित होईल. मोठ्या रुग्णालयांनी ड्युरा सिलिंडर किंवा एअर सेपरेटर घेणे, फायदेशीर राहील.
- अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी,
गुरूवारी आमच्याकडे १५ मेट्रीक टन साठा आला होता. मात्र हा साठा शुक्रवारी सकाळ किंवा दुपारपर्यंत संपून जाईल. त्यामुळे आम्हाला आणखी ऑक्सिजनचा साठा मिळावा, अशी मागणी केली आहे.
- आशिष भंडारी, व्यावसायीक