मोबाइल व पैसे लुटल्यानंतर केली बँकेतून पैसे काढण्याची हिम्मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 09:36 PM2021-03-06T21:36:21+5:302021-03-06T21:36:21+5:30

चौघा भामट्यांनी तरुणाला लुटले : खात्यावर पैसे नसल्याने काढला पळ

After looting mobile and money, Kelly dared to withdraw money from the bank | मोबाइल व पैसे लुटल्यानंतर केली बँकेतून पैसे काढण्याची हिम्मत

मोबाइल व पैसे लुटल्यानंतर केली बँकेतून पैसे काढण्याची हिम्मत

Next


जळगाव : बसस्थानकापर्यंत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नितीन ज्ञानेश्वर बाविस्कर (१७, रा. कृष्णाजीनगर, अडावद, ता. चोपडा) या तरुणास चार भामट्यांनी मारहाण करून त्याचा मोबाइल हिसकावला. या तरुणाकडून आणखी पैसे पाहिजे असल्याने भामट्यांनी त्याला बँकेत नेले. खात्यात पैसे नसल्याने या भामट्यांनी बँकेतून पलायन केल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन बाविस्कर हा तरुण शुक्रवारी दुपारी एसटी बसने जळगावात आला. शिवाजी नगरात उतरल्यानंतर रेल्वे रूळ ओलांडून तो तहसील कार्यालयाजवळ आला होता. तेथे त्याने दुचाकीस्वार भामट्यास बसस्थानकाचा पत्ता विचारला. पत्ता न सांगता भामट्याने नितीनला लिफ्ट दिली. परंतु, त्याला बसस्थानकात न घेऊन जाता एका अज्ञातस्थळी नेले. तेथे भामट्याचे आणखी तीन साथीदार हजर होते. या चौघांनी नितीनला मारहाण करून त्याच्याजवळील १० हजार रुपयांचा मोबाइल व पाचशे रुपये काढून घेतले. भामट्यांनी आणखी काही आहे का? याची तपासणी केली असता नितीनच्या बॅगेतून स्टेट बँकेचे पासबुक मिळून आले. बँकेत किती रक्कम आहे याचीही विचारणा केली. खात्यात पैसे नसल्याचे नितीनने सांगितले. यानंतर भामट्यांनी पुन्हा नितीनला दुचाकीवर बसवून स्टेडियम समोरील स्टेट बँकेत आणले. त्याठिकाणी रितसर नितीनच्या पासबुकची एंट्री करून रक्कम तपासून घेतली. खात्यात पैसे नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चारही भामट्यांनी बँकेतून पळ काढला. तत्पूर्वी त्यांनी नितीनला पोलिसात न जाण्याची धमकीही दिली. भामटे पळून गेल्यानंतर नितीनने शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: After looting mobile and money, Kelly dared to withdraw money from the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.