पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:11 AM2021-02-22T04:11:11+5:302021-02-22T04:11:11+5:30
जळगाव : गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात बंद झालेले उद्योग आता पूर्वपदावर येत असतानाचा पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जर ...
जळगाव : गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात बंद झालेले उद्योग आता पूर्वपदावर येत असतानाचा पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जर पुन्हा लॉकडाऊन झाले तर ते परवडणारे ठरणार नाही. त्यामुळे सर्वांनी योग्य काळजी घेणेच उत्तम पर्याय असून यासाठी उद्योजकांकडूनही यासाठी जनजागृती केली जात आहे.
सप्टेंबर २०२०नंतर कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने सर्वच उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. सहा ते सात महिने मोठ्या आर्थिक झळा सहन केलेल्या सर्वांचीच घडी आता बसू लागली आहे. त्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्यविषयक तसेच अर्थविषयकही चिंता वाढू लागल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग उद्भवला व लॉकडाऊनमध्ये उद्योगांची चाके थांबली. त्यामुळे कधी नव्हे एवढे कामगार, मजुरांचे स्थलांतर झाले. शिवाय उद्योगांचीही घडी विस्कटली. यातून सावरत असताना मजूरही पुन्हा परतले व उद्योगांनी वेग घेतला. मात्र आता कोरोना वाढून पुन्हा उद्योग बंद ठेवायचे म्हटल्यास ते कोणालाही परवडणारे नाही, असे उद्योग संघटनांचे म्हणणे आहे.
शासन जो निर्णय घेईल तो मान्य राहणार आहे. मात्र यात विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी लाॅकडाऊन झाले त्या वेळी उद्योग क्षेत्रात कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. त्यामुळे आतादेखील लॉकडाऊन झाले तरी योग्य काळजी घेण्याविषयी उद्योजक तयार आहेत. मात्र उद्योग पुन्हा बंद करणे म्हणजे उद्योगांसह कामगार, मजूर यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. यामध्ये मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय असल्याने यासाठी सर्व जण काळजी घेतील, असेही सांगितले जात आहे. यात अनेक संघटनांनी तर संसर्ग वाढू लागताच आपल्या पदाधिकारी, कामगार, मजूर यांच्यामध्ये जनजागृती सुरू केली आहे.
धोका वाढतोय
गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने कोरोनाचा पुन्हा धोका वाढू लागला आहे. यात कधीपासून १००च्या खाली असलेली रुग्णसंख्या १५ फेब्रुवारी रोजी थेट १२४ वर पोहचली. लग्नसमारंभ, बैठका, मेळावा यासह बाजारपेठेत होणारी गर्दी यामुळे संसर्ग वाढू लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षाची स्थिती पुन्हा उद्भवते की काय, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.
——————-
पुन्हा लॉकडाऊन झाले तर मोठे कठीण होणार आहे. आता उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत असताना लॉकडाऊन केले तर उद्योगांसमोर मोठे संकट उभे राहील. उद्योग पूर्णपणे बंद न करता नियम कडक केले तरी चालतील, मात्र उद्योग बंद करायला नको.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.
गेल्या वर्षी बंद असलेले उद्योग सुरू झाल्यानंतर आता ते पूर्वपदावर येत आहेत. जर पुन्हा लॉकडाऊन झाले व उद्योग बंद केले तर त्यांची मोठी झळ उद्योगांना सहन करावी लागेल. हे कोणालाही परवडणारे नाही.
- किशोर ढाके, अध्यक्ष, लघु उद्योग भारती.
उद्योगांसदर्भात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. उद्योग बंद करणारे कोणालाही परवडणार नाही. यासाठी कोरोनाचा फैलाव रोखणे आवश्यक आहे. कोरोनाची साखळी तुटली तर त्याचा भविष्यात फायदा होईल.
- सचिन चोरडिया, सचिव, ‘जिंदा’
- कोरोनाचे एकूण रुग्ण-
- बरे झालेले रुग्ण -
- कोरोना बळी -
आठवडाभरातील कोरोना रुग्णांची संख्या
१४ फेब्रुवारी २०२० - १९
१५ फेब्रुवारी २०२० - १२४
१६ फेब्रुवारी २०२० - ६३
१७ फेब्रुवारी २०२० - ७४
१८ फेब्रुवारी २०२० - १६९
१९ फेब्रुवारी २०२० - १५२
२० फेब्रुवारी २०२० - १४६
२१ फेब्रुवारी २०२०