कृषी अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन सातबाºयात वस्तूस्थितीची नोंद करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:54 AM2018-10-08T11:54:16+5:302018-10-08T12:09:35+5:30

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत समाधान

Agriculture officials should go to farm building and register the facts in the seventh house - Chief Minister Devendra Fadnavis | कृषी अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन सातबाºयात वस्तूस्थितीची नोंद करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन सातबाºयात वस्तूस्थितीची नोंद करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next

जळगाव : महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शेताच्या बांधावर जाऊन पीक पेºयाची पाहणी करावी. तसेच वस्तुस्थितीची सातबाºयावर नोंद करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा उपक्रम मिशन म्हणून राबवावा, असेही त्यांनी या वेळी सूचित केले.
जळगाव जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प व विविध विकास कामांचा आढावा तसेच विद्यापीठ नामविस्तार आनंद सोहळा व नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री फडणवीस हे जळगावात आले आहेत. या वेळी नियोजन भवनात जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प व विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
प्रधानमंत्री आवास योजनेबाबत त्यांनी समाधान व्यक्त करीत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जळगाव जिल्ह्याची चांगली प्रगती असल्याचे सांगितले. दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून जिल्हा देशात पहिला आणण्यासाठी प्रयत्न करा, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले.

Web Title: Agriculture officials should go to farm building and register the facts in the seventh house - Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.