अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने आखाजीचा जुगार उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:15 AM2021-05-16T04:15:15+5:302021-05-16T04:15:15+5:30
१४ जणांना पकडले : ८ लाखांचा मुद्देमाल जप्त जळगाव : अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने आखाजीच्या दिवशी ...
१४ जणांना पकडले : ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव : अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने आखाजीच्या दिवशी महामार्गावर बुलेट शोरूमच्या पाठीमागे सुरू असलेला जुगार अड्डा उधळून लावला. १४ जुगाऱ्यांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून ८ लाख १३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महामार्गावर बुलेट शोरूमच्या पाठीमागे जुगार सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यालयातील सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, विजय सोनवणे व अजय पाटील यांच्यासह ट्रॅकिंग फोर्सचे आठ कर्मचारी यांचे पथक तयार करून घटनास्थळावर रवाना केले होते. या पथकाने धाड टाकताच काही जुगारी पळून गेले तर १५ जण हाती लागले. त्यांच्याकडून २१ हजार ६५० रुपये रोख, मोबाइल व एक कार असा एकूण ८ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
पोलीस अंमलदार अजय शांताराम पाटील यांच्या फिर्यादीवरून विशाल घनश्याम भंडारकर (३०, लक्ष्मी नगर), गणेश सुरेश घ्यार (२६, रा. लक्ष्मी नगर), अमोल राजेंद्र सोनार (३२),नितीन प्रकाश सोनवणे (३४, रा.अयोध्या नगर), सुरेश दयाराम सपकाळे (४५, गुरुदेव नगर) नीलेश उखा पवार (२६ म्हाडा कॉलनी) भूषण विजय जैन (३० गुरुकुल सोसायटी) राजेंद्र हरी वानखेडे (४५ सागर पार्क) सुनील नरेंद्र जैन (२८ अयोध्या नगर) ओमप्रकाश नारायण ठाकरे (३३), दीपक अरुण जैन (३४), सतीश नीळकंठ पाटील (२८), आकाश राजेंद्र मंडवे (२४, रा. अयोध्या नगर) व जितेंद्र सुनील पाटील (२५, रा.धानवड, ता.जळगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.