धोबी समाज सभागृहासाठी सर्वस्तरीय पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:16 AM2020-02-03T00:16:10+5:302020-02-03T00:17:28+5:30
परिट (धोबी) समाज सभागृहाचे काम सुरू होत असताना सुसज्ज काम पूर्णत्वास येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्वस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार येथे समाजाच्या चिंतन बैठकीत करण्यात आला.
एरंडोल, जि.जळगाव : येथे परिट (धोबी) समाज सभागृहाचे काम सुरू होत असताना सुसज्ज काम पूर्णत्वास येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्वस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार येथे समाजाच्या चिंतन बैठकीत करण्यात आला. धोबी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र निंबाळकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
एरंडोल तालुका परिट (धोबी) समाज हॉलसाठी स्थानिक विकास कार्यक्रमातून तत्कालीन आमदार डॉ.सतीश पाटील यांनी निधी दिला आहे. त्याचे काम सुरू असताना हॉलपुढे डोम संरक्षक भिंत व पेव्हर ब्लॉक असे विविध कामे होण्यासाठी खासदार उन्मेष पाटील, आमदार स्मिता वाघ तसेच चंदूलाल पाटील व स्थानिक पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून वर्षभरात काम पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला.
नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
एरंडोल परिट (धोबी) समाज तालुकाध्यक्षपदी श्याम बाबूलाल जाधव, शहराध्यक्ष म्हणून चेतन महाले आणि एरंडोल परिट (धोबी) समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश वाघ, उपाध्यक्ष प्रदीप सूर्यवंशी, नितीन तेलंगे, आबा महाले, समाधान शिरसाळे, अजय महाले, अमोल शिरसाळे या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार विवेक ठाकरे व समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र बाबूलाल निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.