जि.प.सदस्यास झालेल्या मारहाणप्रकरणी सर्वपक्षीय एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 04:58 PM2020-10-09T16:58:48+5:302020-10-09T17:05:44+5:30
जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी तालुक्यातील सर्वपक्षीय एकवटले आहेत.
चोपडा : भाजपचे जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी तालुक्यातील सर्वपक्षीय एकवटले आहेत. चोपडा शहरासह तालुक्यात अशी दहशत खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांनी शुक्रवारी बैठकीत दिला.
गजेंद्र सोनवणे यांना अवैध वाळू वाहतूक प्रश्नी २ रोजी मारहाण करून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे वापरून निर्दयी मारहाण केली होती आणि तालुक्यात गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी दहशत निर्माण केली होती. त्याविरोधात प्रशासनाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा नेला जाणार होता. तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून संतप्त अशा भावना यावेळी व्यक्त होत होत्या. अरुणभाई गुजराथी यांनीही या घटनेचा निषेध करून संतप्त भावना व्यक्त केल्या.
शहर आणि तालुक्यात दोन तीन वर्षाच्या कालावधीत दहशतीच्या संदर्भात ज्या घटना घडल्या त्या अत्यंत वाईट आहेत. एखाद्या समाजाच्या किंवा व्यक्तीच्या संदर्भात हे दुखणे नाही. या तालुक्यात असे हाणामारीचे आणि दहशतीच्या घटना यापूर्वी कधीच घडलेल्या नाहीत. यापुढेदेखील याबाबतीत पोलिस अधीक्षकांसह मंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन न्याय मागू शकतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करावा. दहशत थांबवा यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासना च्या विरोधात सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यांनी ९ रोजी मोर्चा नेण्याचे ठरविले होते. मात्र तहसीलदार छगन वाघ आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे श निरीक्षक संजय ठेंगे यांनी कलम १४४ लागू असल्याने मोर्चा काढता येणार नाही, असे सांगितले. यामुळे बाजार समितीच्या आवारातच ैबैठक झाली.
अरुणभाई गुजराथी म्हणाले की, माझ्या ५० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अशा घटना या तालुक्यात कधी पाहिल्या नाहीत. हा जो लढा आहे हा सर्वपक्षीय आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, मनसे, रिपब्लिकन पक्ष असे सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. त्याचे एकच कारण आहे की दहशतवादाच्या विरोधात आपण एकत्र आले पाहिजे आणि या तालुक्यात ४०-५० वर्षात जे काही घडले नाही ते आता का घडत आहे याबाबतीत हा आजचा मोर्चा होता. परंतु प्रशासनाने मोर्चा नेऊ नये अशी विनंती केल्याने मोर्चा थांबविण्यात आला आहे.
तपासाधिकारी यांची बदली करा
या घटनेसंदर्भात चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्याविषयी शंका निर्माण करून तपास योग्य दिशेने होत नसल्याने त्यांना तत्काळ निलंबित करावे व नव्याने तपास अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणीही या वेळी या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी केली.
तपास योग्य दिशेने होईल -पो.नि.संजय ठेंगे
दरम्यान, मोर्चा काढू नये या विनंतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांसमोर आलेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि तहसीलदार छगन वाघ यांनी मोर्चा काढू नये अशी विनंती केल्याने मोर्चा थांबवण्यात आला. मात्र बैठकीत ज्या शंकाकुशंका व्यक्त करण्यात आल्या होत्या त्या बाबतीत अधिकाºयांनी होकार दिल्याने यापुढे तपास योग्य दिशेने केला जाईल. तसेच अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी शहराच्या सर्व सीमा बंद केल्या जातील आणि अवैध वाहतूक पूर्ण अवैध वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात येईल, असेही आश्वासन या बैठकीत प्रशासनाकडून निरीक्षक ठेंगे यांनी दिल्यानंतर मोर्चेकरी शांत झाले.
मोचार्साठी जमलेले व नंतर बैठकीत रूपांतर झालेल्या या सभेमध्ये शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष इंदिराताई पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, पालिका गटनेते जीवन चौधरी, चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम पाटील, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंदराव रायसिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते शांताराम पाटील, भाजपचे माजी पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके, पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी.साळुंखे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जयस्वाल, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे, चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे, शेतकी संघाचे प्रेसिडेंट पाटील एल.एन.पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नारायण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माजी सदस्य विजय पाटील, प्रमोद बोरसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोपाल पाटील, बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर पाटील, सभापती कांतीलाल पाटील, प्रवीण गुजराथी, देवेंद्र सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादी, भाजप पदाधिकाºयांसोबतच विविध संस्थांमधील संचालक पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक या मोर्चा वेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थिती मोठी असल्याने सोशल डिस्टसिंग चा फज्जा उडालेलाही दिसून आला.