संजय पाटीलअमळनेर : शनिवार हा अमळनेरकरांसाठी घातवार ठरला. एकाच दिवशी तालुक्यातील ११ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्यावर व चोपडा येथील २ रुग्णांनावर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच तालुक्यात आज १३५८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी ८६ जण पॉझिटिव्ह आले असून टक्केवारी ६.३३ आहे. अमळनेर तालुक्यातील ग्रामीण व खाजगी कोविड सेंटर मधील दाखल पुरुषोत्तम कांशीराम पाटील (यश प्लाझा , धुळे रोड) , पंढरीनाथ फुलचंद साळुंखे (स्वामी विवेकानंद नगर पिंपळे रोड), श्रीकांत सोमा जाधव (एस.के. नगर चोपडा) , एकनाथ चतुर पाटील (रा. फापोरे), आत्माराम तुळशीराम बिऱ्हाडे (गायत्री नगर तांबेपुरा), भागवत वना चव्हाण (एलआयसी कॉलनी), अजय खंडूजी चंदनखेडे (समर्थ नगर), राजेंद्र विठ्ठल पाटील (तांबेपुरा), प्रवीण माधवराव येवले (जी एस हायस्कूल मागे), दगडू त्र्यंबक पाटील (पैलाड भवानी चौक), शामराव रामचंद्र पाटील (हातेड), अशोक चतुर पाटील (शिरसाळे), आधार भिका महाजन (श्रीराम कॉलनी) यांचा कोरोना संशयित आजाराने मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर पैलाड येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.७११ जणांची चाचणी शहरी भागात ७११ जणांची चाचणी केली. त्यात ६० जण पॉझिटिव्ह आहेत ग्रामीण भागात ६४७ जणांची चाचणी करण्यात आली. त्यात २६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. ५८१ जणांच्या अँटीजन चाचणीत ४२ पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या दोन तीन दिवसांपासून पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १० टक्के पेक्षा कमी झाल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे.
अमळनेरला ११ जणांचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 11:23 PM
अमळनेरला ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
ठळक मुद्देशनिवार ठरला घातवारचोपड्याच्या दोघांवरही अंत्यसंस्कार