अमळनेरच्या ‘राजश्री’ने उभे केले शून्यातून विश्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:24 PM2018-10-11T22:24:22+5:302018-10-11T22:27:15+5:30

राजश्री पाटील (रा. सबगव्हाण ता. अमळनेर) यांनी प्रगतीकडे वाटचाल सुरु केली आहे. घटस्फोटानंतर त्यांनी महिलांसाठी एका सेवाभावी संस्थेची उभारणी केली.

Amalner's 'Rajshree' raised the world from zero | अमळनेरच्या ‘राजश्री’ने उभे केले शून्यातून विश्व

अमळनेरच्या ‘राजश्री’ने उभे केले शून्यातून विश्व

googlenewsNext
ठळक मुद्देआधुनिक नवदुर्गेचा खचलेल्या महिलांसाठी आधारयशदा येथे देताहेत विविध विषयांचे प्रशिक्षणश्रम व रोजगार मंत्रालयातर्फे झाला गौरव

रवि मोरे ।
अमळनेर : ‘शून्यातून विश्व निर्माण करणे..’ ही म्हण ऐकीवात आहे. मात्र याची प्रचिती क्वचितच बघावयास मिळते. हुंड्यासाठी सासरी होणारा छळ त्यातच नवऱ्याकडून एक नव्हे, दोन नव्हे तर तीनवेळा जीवे मारण्याचा प्रयत्न यातून स्वत:ला सावरत राजश्री पाटील (रा. सबगव्हाण ता. अमळनेर) यांनी प्रगतीकडे वाटचाल सुरु केली आहे.
घटस्फोटानंतर त्यांनी महिलांसाठी एका सेवाभावी संस्थेची उभारणी केली. संस्था आणि दंत्तोपंत ठेंगडी राष्टÑीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने खेड्यापाड्यात जाऊन विधवा, घटस्फोटीत महिलांना एकत्रित केले. शिवाय त्यांना रोजगार मिळून त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्यात म्हणून अनेक महिला बचत गट स्थापन करुन महिलांना संघटीत केले.
विशेष म्हणजे इतर महिलांना सक्षम करण्याआधी त्या स्वत: सक्षम झाल्या. रडत न बसता त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यातच समाजसेवेची आवड असल्याने सध्या समाजकार्याच्या उच्च पदवीचे शिक्षण घेत आहेत.
राजश्री या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. तर यशदा (पुणे) येथे प्रशिक्षण घेऊन त्या उत्कृष्ट प्रशिक्षकही झाल्या. आजपर्यंत त्यांनी जळगाव, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आदी ठिकाणी वर्ग १, वर्ग २ च्या अधिकाºयांना माहिती अधिकार, पेसा कायदा, पंचायत राज आदी विविध विषयांवर प्रशिक्षित केले आहे. त्यांना १० वर्षाचा मुलगा आहे. भाऊ नसल्याने वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करुन मुलाचेही कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्टÑीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे राजश्री पाटील यांचा विशेष गौरवही करण्यात आला आहे.

Web Title: Amalner's 'Rajshree' raised the world from zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.