अमळनेर, जि.जळगाव : रुख्मिणी कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर २ ते ८ पर्यंत फापोरे, ता.अमळनेर येथे आयोजित केले आहे.सात दिवसीय शिबिरात स्वयंसेविका ग्रामीण परिसरात जाऊन ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनासोबत समरस होणार आहेत. या दरम्यान सानेगुरुजी स्मारक समितीच्या संचालिका दर्शना पवार यांचे २ रोजी ‘ग्रामीण महिलांसाठी शिक्षण व रोजगाराच्या संधी’, ३ रोजी डॉ.मयुरी जोशी यांच्याकडून महिलांची आरोग्य तपासणी ४ रोजी सानेगुरुजी फाउंडेशनचे नरेंद्र पाटील यांचे ‘पर्यावरण संवर्धनासाठी फ्रायडे फॉर फ्युचर’, ५ रोजी महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे मॅनेजर यांचे ‘महिलांसाठी बँकेच्या विविध योजना’ या विषयावर व्याख्यान, ६ रोजी अॅड.प्रतिभा मगर यांचे ‘महिला व कायदे’ या विषयावर व्याख्यान, ७ रोजी सुनील अहिरराव यांचे ‘ग्राम व जलसाक्षरता’ या विषयावर व्याख्यान, ८ रोजी प्राचार्य डॉ.मधुकर शिंदे यांचे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या विषयावर व्याख्यान होणार आहेत.सर्व व्याख्याने दुपारी दोनला सुरू होतील. दैनंदिन कार्यक्रमात ग्रामस्वच्छता, साक्षरता, लाईफ स्किल, मेक इन इंडिया, महिला स्वावलंबन इ. कार्यक्रम राबविले जातील. शिबिराचा समारोप ८ जानेवारीला दुपारी तीनला होईल. शिबिर यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जे.शेख, उपप्राचार्य प्रा. श्याम पवार, कार्यक्रम अधिकारी डॉ.देवकीनंदन महाजन, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.मंजुषा खरोले, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व एन.एस.एस.च्या सर्व स्वयंसेविकांचे सहकार्य राहणार आहे.
अमळनेरच्या महिला कॉलेजचे आजपासून फापोरे येथे शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 2:53 PM
रुख्मिणी कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर २ ते ८ पर्यंत फापोरे, ता.अमळनेर येथे आयोजित केले आहे.
ठळक मुद्देराष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर२ ते ८ जानेवारी दरम्यान शिबिरात विविध उपक्रम