थकहमी मिळणाऱ्या कारखान्यांमध्ये 'मधुकर'चाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 07:54 PM2020-08-21T19:54:51+5:302020-08-21T19:56:27+5:30
राज्य शासनाने नुकत्याच मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील ३७ कारखान्यांना संचालकांच्या वैयक्तिक थकहमीशिवाय कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.
वासुदेव सरोदे
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : राज्य शासनाने नुकत्याच मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील ३७ कारखान्यांना संचालकांच्या वैयक्तिक थकहमीशिवाय कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचा समावेश असल्याची माहिती शरद महाजन यांनी दिली. मात्र यासंदर्भातील परिपत्रक हातात नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे ‘मधुकर’चे चेअरमन शरद महाजन यांनी सांगितले.
राज्यातील ३७ कारखान्यांना थकहमी देण्यासाठी तसेच त्यामध्ये ‘मधुकर’चा समावेश असल्याची माहिती मिळाली. मात्र त्या संदर्भातील परिपत्रक व त्यातील अटी शर्ती उपलब्ध झालेल्या नाही.
सदरची थकहमी कारखाने सुरू करण्यासाठी लागणारे पूर्वहंगामी कर्जासाठी असल्याचे समजते, असे सांगत या वर्षी राज्यात उसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे. त्यात मागील वर्षाची साखर पडून आहे. त्यामुळे बºयाच कारखान्यांना पूर्वहंगामी कर्ज मिळण्यासाठी अडचणी निर्माण झालेले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी संचालकांच्या थकहमी शिवाय कर्ज देण्याचा चांगला निर्णय झाला आहे. मात्र ‘मधुकर’सह राज्यातील आजारी कारखान्यांना आता केवळ थकहमी नव्हे तर मोठ्या आर्थिक पॅकेज स्वरूपात सहकार्य केल्याशिवाय कारखाने सुरू होणार नाही हे वास्तव असल्याचे चेअरमन महाजन यांनी सांगितले.