जळगाव - राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्युएस) शैक्षणिक संस्थेत प्रवेशासाठी जागा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने एम एस्सी(सर्व विषय) आणि एम ए/एम एस्सी (भूगोल) प्रथम वर्षे अभ्यासक्रमाच्या पुढील प्रवेश प्रक्रियेला ३१ डिसेंबर पर्यंत स्थगिती दिली आहे.या अभ्यासक्रमाची पहिली फेरी २२ व २३ डिसेंबरला झाली. पुढची फेरी २९ व ३० डिसेंबरला होती, मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत लाभ देण्याचे शासन निर्देश प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यापीठाने ३१ डिसेंबर पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया स्थगित केली आहे.विद्यापीठामार्फत सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. अशी माहिती प्र-कुलगुरू प्रा.पी पी माहुलीकर व प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष प्रा.ए.बी.चौधरी यांनी दिली.