आणि... विद्यार्थ्यांनी भीक मागून गोळा केला निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 07:31 PM2020-11-12T19:31:26+5:302020-11-12T19:33:11+5:30
विविध मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मासूतर्फे जिल्हाधिकारी परिसरात भीकमांगो उपक्रम
जळगाव : वारंवार पाठपुरवा करून सुध्दा राज्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट परतावा व प्रवेश फीमध्ये सुट यावर अद्याप उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला नाही़ शासनाकडे शुल्क परताव्याासाठी निधी नसावा़ त्यामुळे शासनाची तिजोरी भरावी म्हणून महाराष्ट्र स्टुडंट युनियच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क रस्त्यावर उतरून भीक मागत निधी गोळा केला़ त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात आले होते़ या धर्तीवर बैठीकीमध्ये विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने वसूल केलेली प्रथम व द्वितीय वर्षाचे परीक्षा शुल्क सरसकट परत करावे किंवा पुढच्या परीक्षांमध्ये समायोजित करावी आणि शैक्षणिक वर्ष २०-२१ साठी प्रवेश शुल्कामध्ये सूट देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियनतर्फे करण्यात आली होती़ त्यावर बैठक सुध्दा झाली़ त्यातफक्त शिकवणी शुल्कासाठी सुलभ हफ्ते प्रदान करण्याचे आणि विकास शुल्क जवळपास ४० टक्केपर्यंत आकारावे आणि याव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, याबाबत सवार्नुमते विचारविनिमय होऊन अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ दरम्यान, दोन महिने उलटून देखील अद्याप उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही़ विभागाकडे निधी नसावा म्हणून निर्णय घेण्यात आला नाही़ त्यामुळे हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी गुरूवारी महाराष्ट्र स्टुंडट युनियतर्फे राज्यभरात भीक मांगो उपक्रम राबविण्यात आला़ काही ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाºयांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे आंदोलन नसून उपक्रम़़़़
गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे पदाधिकारी भीम मांगो उपक्रमासाठी जमल होते़ हे पोलिसांना हटकले असता, त्यांनी परवानगी घेतली का अशी विचारणा केली़ त्यानंतर पदाधिकाºयांनी जिल्हापेठ पोलिसात परवानगीसाठी धाव घेतली आधी परवानगी नाकारण्यात आली़ मात्र, आंदोलन नसून उपक्रम असल्याचे संघटनेचे विभाग प्रमुख अॅड. अभिजित रंधे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन व जिल्हा सचिव रोहित काळे यांनी समजवून सांगितले़ त्यानंतर संघटनेला परवानगी देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी भीक मागत गोळा केला निधी
पोलिसांची परवानगी मिळताच संघटनेच्या पदाधिकाºयांनी आकाशवाणी चौकात थांबून वाहनधारकांकडून भीक मागत निधी गोळा केला़ गोळा केलेला निधी हा शासनाची तिजोरी भरण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना देण्यात येणार आहे़ दरम्यान, दोन ते तीन तास हा उपक्रम राबविल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊ त यांची भेट घेवून परीक्षा शुल्क परतावा व प्रवेश फी सुटीबाबत निवेदन देण्यात आले़ यावेळी संघटनेचे विभाग प्रमुख अॅड़ अभिजित रंधे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन व जिल्हा सचिव रोहित काळे उपस्थित होते.
- आंदोलनाच्या शेवटी उदय सामंत यांनी मासुचे संथापक अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे व पदाधिकाºयांची भेट घेतली़ त्यावेळी फी रेगुलेटिंग आॅथॉरिटी यांनी बनवलेल्या अहवालामधे त्रुटी असल्यामुळे शासकीय निर्णय घेता आला नाही़ परंतु दिवाळी नंतर यावर अंतिम बैठक घेऊन या सगळ्या त्रुटी दूर करुन विद्यार्थ्यांना दिलासा दिला जाईल असे सकारात्मक आश्वासन उदय सामंत यांनी दिले.