ट्रकचा कट लागल्यावरुन वाद झाला अन‌् दुचाकी चोरीचा भांडाफोडा झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 07:46 PM2020-11-23T19:46:48+5:302020-11-23T19:47:18+5:30

संशयितला अटक : वाद नंदूरबारात दुचाकी चोरली जळगावात

An argument broke out after the truck was cut and a two-wheeler theft case was registered | ट्रकचा कट लागल्यावरुन वाद झाला अन‌् दुचाकी चोरीचा भांडाफोडा झाला

ट्रकचा कट लागल्यावरुन वाद झाला अन‌् दुचाकी चोरीचा भांडाफोडा झाला

googlenewsNext

जळगाव : नंदूरबारमध्ये ट्रकचा दुचाकीला कट लागल्यानंतर ट्रक चालक व दुचाकीस्वारात वाद झाला. प्रकरण पोलिसात गेले अन‌् तेथे दुचाकी चोरीचा भांडाफोड झाला. श्रीकांत प्रकाश मोरे (२४, रा.अमळगाव, ता.अमळनेर) असे चोरट्याचे नाव असून जिल्हा पेठ पोलिसांनी त्याला नंदूरबारमधून अटक केली. दरम्यान, सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. श्रीकांत याने जिल्हा क्रीडा संकुलाच्या पार्कींगमधून दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत मोरे हा नंदूरबारमध्ये दुचाकीने (क्र.एम.एच.१५ बी.एच.४५३३) जात असताना रविवारी ट्रकचा कट लागल्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. पोलिसांनी हे भांडण सोडविले, मात्र भांडणानंतरही श्रीकांत याने ट्रकचालकाला पुढे चल तुला बघून घेतो, अशी धमकी दिली होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून नंदुरबार तालुका पोलिसांनी श्रीकांत मोरे यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी त्याच्याकडील दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. बोलण्यातच संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने ही दुचाकी चोरीची असल्याची सांगून जळगाव शहरातील जिल्हा क्रिडा संकुलाच्या पार्किंगमधून चोरल्याची कबुली दिली. नंदुरबार पोलिसांनी जिल्हापेठ पोलिसांशी संपर्क साधून तुमच्या हद्दीत चोरी झालेली दुचाकी जप्त केली असल्याचे सांगितले. त्यानुसार कर्मचारी प्रविण भोसले, हेडकॉन्स्टेबल विजय सोनार यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गाठून संशयित श्रीकांत मोरे यांच्यासह दुचाकी ताब्यात घेतली. दरम्यान श्रीकांत यास अटक केल्यावर जिल्हापेठ पोलिसांनी सोमवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

क्रीडा संकुलासमोरुन चोरली दुचाकी
विनयकुमार अक्षयकुमार जोशी (वय ५६, रा. नेहरुनगर) हे छत्रपती शिवाजी क्रिडा संकुल येथे एका फर्ममध्ये कामाला आहेत.२३ ऑक्टोंबर रोजी जोशी हे कार्यालयात आले. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी कार्यालयाच्या बाहेर पार्किंग केली. काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाले असता, दुचाकी गायब होती. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून आल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी जोशी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: An argument broke out after the truck was cut and a two-wheeler theft case was registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.