फोटो
जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि. जळगाव : सहावीत शिकणाऱ्या अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे या बालकलाकाराची अभियन मुद्रा थेट सातासमुद्रापार झळाळून निघाली आहे. यंदाच्या बोस्टन फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याला ‘सर्वोकृष्ट बालकलाकाराचे’ मानांकन मिळाले आहे. अर्जुनच्या भरारीने चाळीसगावचे नाव पुन्हा सातासमुद्रापार पोहोचले आहे.
डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटात अर्जुनने मुख्य बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. याच चित्रपटाला शिकागो व इटली येथील फिल्म फेस्टिव्हलचेही मानांकन मिळाले आहे. महाराष्ट्रात प्राणीमित्र म्हणून ओळखले जाणारे कै. डॉ. वा.ग. व डॉ. प्रमिला पूर्णपात्रे यांचा अर्जुन हा पणतू, तर डॉ. सुभाष व डॉ. हेमांगी पूर्णपात्रे यांचा तो नातू आहे.
चौकट
२४ पासून बोस्टन फिल्म फेस्टिव्हल सुरू होत आहे. यात निवड झालेल्या १२ चित्रपटांमध्ये एकदा काय झालं याचा समावेश आहे. यातील मुख्य बालकलाकाराच्या भूमिकेसाठी अर्जुनला मानांकन मिळाले आहे. याबरोबरच इटलीच्या फिल्म फेस्टिव्हल व शिकागोच्या साऊथ एशियन फिल्म
फेस्टिव्हलसाठीही चित्रपटाची निवड झाली आहे.
चौकट
१७०० मुलांमधून झाली निवड ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट म्हणजे एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट आहे. ठाणे आणि पुण्यात घेतलेल्या निवड चाचणीत १७०० मुलांमधून अर्जुनची मुख्य बालकलाकाराच्या भूमिकेसाठी निवड झाली आहे. निवड चाचणीसाठी लागणारे लिखाणही त्यानेच केले होते.
कोट
चित्रीकरणादरम्यान दडपण फारसे आले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळाल्याने माझी भूमिका सातासमुद्रापार पाहिली जाणार आहे याचा आनंद आहे.
-अर्जुन पूर्णपात्रे, जळगाव