धरणगावात उतारू व भिकाऱ्यांची प्रशासनाने केली व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 04:28 PM2020-04-05T16:28:11+5:302020-04-05T16:29:20+5:30
उड्डाण पुलाखाली राहत असलेले उतारू व भिकाऱ्यांसाठी येथील जि.प.शाळेत निवारा केंद्र करण्यात आले आहे.
धरणगाव, जि.जळगाव : शहरातील उड्डाण पुलाखाली राहत असलेले उतारू व भिकाऱ्यांसाठी येथील जि.प.शाळेत निवारा केंद्र करण्यात आले आहे. त्यांची राहण्याची व दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.
येथील उड्डाण पुलाखाली बहुसंख्येने उतारू व भिक्षुक राहत होते. लॉकडाऊन असल्याने त्यांचे हाल होत असल्याने नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी त्यांची शिवसेनेतर्फे जेवणाची व्यवस्था केली होती.
४ रोजी चौधरी यांनी तहसीलदार नितीनकुमार देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाच्या माध्यमातून उतारू व भिकाºयांंसाठी मराठी शाळा क्रमांक एकमध्ये निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. त्यांची राहण्याची व दोन्ही वेळ जेवणाची व्यवस्था केल्याने त्यांच्या चेहºयावर तूर्त हास्य फुलले आहे.