आॅनलाईन लोकमतपळासखेडे बुद्रूक ता.जामनेर : जैन इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात झाले.अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागाचे माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील, स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पाटील, प्रा.शरद पाटील, जितेंद्र पाटील, संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडीया, सचिव मनोजकुमार कावडीया, संचालक शैलेश ललवाणी, अभय कावडीया, अशोक तालेरा, प्रकाशचंद कावडीया उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व चित्रपट गीत, नृत्य, लावणी, भारूड सादर केले. कार्यक्रमाला सचिन बसेर, पुखराज डांगी, राजेंद्र भुरट, हरीशचंद्र पवार, माधव थोरात, अरविंद माळी, तुषार पाटील, गोविंदा लोंखडे, विशाल इंगळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्या फिरोजा खान यांनी केले. सूत्रसंचालन एकनाथ पाटील व मेघा रेंगे तर आभार प्रदर्शन संदीप शिंदे यांनी केले.
पळासखेडे बुद्रुक येथे चिमुकल्यांनी सादर केला कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 4:19 PM
जैन इंटरनॅशनल स्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात
ठळक मुद्देचिमुकल्यांनी सादर केले देशभक्तीपर नृत्यजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थितीविद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने मिळविली उपस्थितांची दाद