आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 07:26 PM2019-05-08T19:26:08+5:302019-05-08T19:27:59+5:30

राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरीस येणाºया पालखी सोहळ्यांच्या नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी केली आहे.

Ashadhi Vari Palkhi Sohal should be held in the Ministry of Planning | आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी

आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी

Next
ठळक मुद्देसंजय धोंडगे व अ‍ॅड.रवींद्र पाटील यांची मागणीदिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढतेयत्या तुलनेत सोयीपेक्षा गैरसोयच अधिक होतेतुटपुंजे पास दर्शनासाठी मिळतात

मुक्ताईनगर, जि.जळगाव : राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरीस येणाºया पालखी सोहळ्यांच्या नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी केली आहे.
यंदा आषाढीची वारी १२ जुलै रोजी आहे. या आषाढी वारीसाठी संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा ८ जून रोजी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा, ९ जून रोजी श्रीक्षेत्र शेगावहून, संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा १६ जून रोजी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरहून, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा २४ जून रोजी श्रीक्षेत्र देहूहून, संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा २४ जून रोजी श्रीक्षेत्र पैठणहून, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा २५ जून रोजी श्रीक्षेत्र आळंदीहून तर संत सोपानकाकांचा पालखी सोहळा ३० जून रोजी श्रीक्षेत्र सासवडहून प्रस्थान ठेवीत आहेत .
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक पुणे येथे विधानभवनात होते तर राज्यातील इतर पालखी सोहळ्यांकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होते. पंढरपूर येथे आषाढी वारीपूर्वी सोलापूरचे पालकमंत्री बैठक घेतात परंतु त्यामध्ये राज्यातील पालखी सोहळ्यांच्या नियोजनापेक्षा स्थानिक प्रश्नाकडेच अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे राज्यातील पालखी सोहळ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होते.
संत मुक्ताबाईं व संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा हा जळगाव, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून येतो. या पालखी सोहळ्याचा प्रवास सुमारे एक महिन्यापेक्षा अधिक असतो. या सोहळ्याबरोबर सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक वारकरी असतात. संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा नाशिक, अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यातून येतो. या पालखी सोहळ्याबरोबर सुमारे एक लाख वारकरी असतात तर संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा औरंगाबाद, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करतो. या पालखी सोहळ्या बरोबर सुमारे ५० हजार वारकरी असतात.
आषाढी वारीसाठी येणाºया या पालखी सोहळ्यांसमोर वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, सुरक्षा, गॅस, रॉकेल व पंढरपूर येथे आल्यानंतर मिळणारे तुटपुंजे दर्शन पास या सर्व अडचणी असतात. या अडचणीकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जिल्हा सीमेवर प्रशासन सज्ज असते. सर्व सुविधा शासन पुरविते मग इतर संतांच्या बाबतीतच असा दुजाभाव का? या सुविधा राज्यातील इतर पालखी सोहळ्यांनाही मिळाल्या पाहिजेत.
दिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. मोठ्या प्रमाणात सुशिक्षित समाजही सोहळ्यात येऊ लागला आहे. त्यामुळे मुक्कामाच्या जागाही कमी पडू लागल्या आहेत. संत ज्ञानदेव, संत तुकाराम व संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याला ज्याप्रमाणे सुविधा दिल्या जातात तशा सुविधा राज्यातील इतर पालखी सोहळ्यांना मिळावी यासाठी राज्यातील पालखी मार्गावरील जिल्हा प्रशासनाची व पालखी सोहळा प्रमुखांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील व संजय महाराज धोंडगे यांनी केली आहे.

Web Title: Ashadhi Vari Palkhi Sohal should be held in the Ministry of Planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.