सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या कार्यालयातील हवालदार विजय काळे, कैलास सोनवणे, रवींद्र मोतीराया व महेश महाले यांना सोबत घेऊन जिल्हापेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रिंगरोडनजीकच्या एका रुग्णालयाच्या पाठीमागे सुरू असलेल्या सट्टा जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी सचिन अनंत जाधव (वय २५,रा.जोशी पेठ),गौतम धोंडू तायडे (वय ५९,रा.समता नगर), सुदर्शन विजयसिंग राजपूत (वय ३५,रा.हिराशिवा कॉलनी), गोपाळ काशिनाथ पाटील (वय ३६, रा.त्रिभुवन कॉलनी), रमेश रामकृष्ण बारी (वय ४९,रा.रामेश्वर कॉलनी), अनिल विठ्ठल कोठावदे (वय ६२,रा.गणेश कॉलनी)व संदीप पांडुरंग चव्हाण (वय २६,रा.वाघ नगर) यांना पकडले. त्यांच्याकडून ९ हजार ३०० रुपये रोख, मोबाइल, दुचाकी असा ७८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुजराल पेट्रोल पंपाजवळील बांधकामाच्या ठिकाणी झोपडीत सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर शामलाल चंदुमल कुकरेजा (वय ६२,रा.सिंधी कॉलनी), भारत शामलाल कुकरेजा (वय २६,रा.सिंधी कॉलनी) व अशोक शशिकांत चौधरी (वय ३६,रा.रामेश्वर कॉलनी) या तिघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ११ हजार ८२० रुपये रोख, मोबाइल व दुचाकी मिळून २४ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पिंप्राळा येथील सोमानी मार्केटमध्ये एका दुकानात विठ्ठल राजपूत याच्या सांगण्यावरून सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर हनीफ गुलाम रसुल पिंजारी (वय ५०, रा.प्रताप नगर), सोनू बनवारीलाल सैनी (वय १८,रा.पिंप्राळा), हरिश्चंद्र बाबुराव रुले (वय ६७, रा.हरिविठ्ठल नगर), मुकुंद प्रल्हाद वानखेडे (वय ४४, रा.पिंप्राळा, हुडको) व शीतल अभिमन शिरसाळे (वय ४१,रा.प्रबोध नगर) यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून १२ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.