जाेगेतांडा फाटा-मालखेडा दरम्यान दहशतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:49+5:302021-06-23T04:12:49+5:30

पिंपळगाव (हरे.), ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या पाचोरा जामनेर रस्त्याने आंबेवडगावजवळील जोगे तांडा फाटा ते मालखेडा दरम्यान ...

An atmosphere of terror between Jagetanda Fata-Malkheda | जाेगेतांडा फाटा-मालखेडा दरम्यान दहशतीचे वातावरण

जाेगेतांडा फाटा-मालखेडा दरम्यान दहशतीचे वातावरण

Next

पिंपळगाव (हरे.), ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या पाचोरा जामनेर रस्त्याने आंबेवडगावजवळील जोगे तांडा फाटा ते मालखेडा दरम्यान वनविभागाच्या राखीव जंगल परिसरात जाणाऱ्या पाचोरा-जामनेर रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर मध्यरात्री अज्ञाताने दगडफेक केली. यामध्ये एक दुचाकीस्वार जखमी झाला; मात्र त्याने तक्रार देण्यास नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

दिनांक २१ रोजी रात्री ११ ते साडेअकरा वाजेच्या सुमारास अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत दोंडवाडे (ता. जामनेर) येथील एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून इको कंपनीच्या (एमएचसीझेड ४६७४) गाडीवरही दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान, रात्रीचा काळोख असल्याचा फायदा उठवत ही दगडफेक करण्यात आली असून त्यामुळे नेमके हल्लेखोर कोण होते, हे कळू शकले नाही.

अज्ञातांकडून रस्ता लुटीच्या इराद्याने हा हल्ला झाल्याचे समजते. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुर्णी दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे या पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र पाटील, वाहनचालक विजय महाजन, होमगार्ड आदींसह घटनास्थळी दाखल झाल्या. या हल्ल्यात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराची भेट घेतली असता त्याने उपचार घेण्यास तसेच तक्रार देण्यास नकार दिला.

पोलिसांनी त्यांना धीर देत ‘तुम्ही आमच्यासोबत चला, आम्ही तुम्हाला वैद्यकीय उपचारास घेऊन जातो’, असे म्हटले असता दुचाकीस्वाराने मला किरकोळ मार लागलेला आहे. मी घरीच उपचार करून घेईल व माझी लूटमार वगैरे झालेली नसल्याने मला तक्रार वगैरे द्यायची नाही, असे सांगितले. त्यामुळे या जखमी दुचाकीस्वाराचे नाव कळू शकले नाही. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मध्यरात्री रात्री २ वाजेपर्यंत त्या जंगल परिसरात सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह गस्त घातली. मात्र हल्लेखोर मिळून आले नाहीत.

चौकट

जंगलमय परिसर

याच परिसरात परंतु सोमवारी मध्यरात्री झालेल्या घटनेच्या स्थळापासून १० किमीवर काही दिवसांपूर्वी असाच हल्ला करण्यात आला होता. हा परिसर जंगलमय असल्याने आणि त्याठिकाणी निर्जन रस्ता असल्याने लुटीच्या इराद्याने हल्ला करणे चोरट्यांना सोपे जाते, असे काही वाहनचालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या हल्लेखोरांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

===Photopath===

220621\22jal_4_22062021_12.jpg

===Caption===

जाेगेतांडा फाटा-मालखेडा दरम्यान दहशतीचे वातावरण

Web Title: An atmosphere of terror between Jagetanda Fata-Malkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.