जळगाव : मानराज पार्क परिसरातील द्रौपदी नगरात सुनंदा जालम चौधरी (वय ५२) यांचे राहते घर मध्यरात्री दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात दुचाकी, सोफासेट व खुर्ची जळून खाक झाली आहे. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून दोघांनी हे कृत्य केले असून परिवाराला जीवंत जाळण्याचाच त्यांचा उद्देश असल्याचा संशय चौधरी यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, दुचाकीवरुन आलेले दोन्ही चोरटे घराच्या परिसरात येताना व दुचाकीवर पेट्रोल टाकताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला सोमवारी अज्ञात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, या आगीत घराचे शटर, खिडक्या, बाहेरील फर्निचर, काच यासह अन्य साहित्य जळून खाक झालेले आहे. मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे कुटुंब कमालीचे घाबरले. शेजारील लोकांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. आग लागताच संशयितांनी तेथून पळ काढला. या आगीमुळे परिसरात प्रचंड दहशत व भीतीचे वातावरण आहे.गेल्या काही दिवसापासून दुचाकी व रिक्षा जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. कांचननगर, चौघुले प्लॉट व निमखेडी शिवारातील विठ्ठलवाडी या भागातील वाहने जाळण्याच्या घटना ताज्या आहेत.दुचाकी जाळल्याबाबत चौघुले प्लॉटमधील नागरिकांनी शनी पेठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे.एक दुचाकीवर थांबून तर दुसºयाने लावली आगद्रौपदी नगरात प्लॉट क्र.२ व गट क्र.४० मध्ये सुनंदा चौधरी यांचे घर आहे. चौधरी या बॅँकेत नोकरीला आहेत.रविवारी रात्री १२.५ वाजता महामार्गाकडून दुचाकीवरुन दोन जण घराजवळ आले. एक जण दुचाकीवरच थांबून होता तर दुसरा घराच्या आवारात येऊन दुचाकीवर पेट्रोल टाकून जाळताना स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसरा दुचाकीचा दिवा सुरु करुन घराकडे व कॅमेºयाच्या दिशेन उजेड करीत आहेत. आपण कॅमेºयात येऊ नये याची दोघांनी पुरेपुर काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे.यापूर्वीही मुलाला मारहाणघराला व दुचाकीला ही आग कोणी लावली याची माहिती सुनंदा चौधरी यांनी पोलिसांना दिली आहे. संशयित व्यक्ती नातेवाईकच असून याआधी त्याने गुंडांकडून मुलाला मेहरुण तलावाकडे बेदम मारहाण केली होती. तसेच एका महिलेनेही विनयभंग करण्याची धमकी दिली होती. सातत्याने या लोकांकडून धमकावणे व मारहाणीचे प्रकार होत आहेत. याबाबत जिल्हा पेठ पोलिसांकडे तक्रार करुनही त्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. घरात नवबाळतीण असताना या संशयितांकडून घर जाळण्याचा प्रकार झाला. तक्रारीवर ठाम राहिल्यानेच आता पोलिसांनी तक्रार घेतली असेही चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत.
जळगावात मध्यरात्री महिलेचे घर पेटविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:02 PM
दुचाकी व इतर साहित्य जळाले
ठळक मुद्देसंशयित दोघं जण ‘सीसीटीव्ही’त कैदमध्यरात्री घडलेल्या घटनेने कुटुंब भेदरले