गुलाबराव पाटलांच्या वाढदिवसाला जनसेवेचा जागर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:55+5:302021-06-06T04:13:55+5:30
जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आधी जाहीर केल्यानुसार त्यांच्या वाढदिवसाला कोणत्याही जाहीर कार्यक्रमाचे आयोजन न करता फक्त सोशल ...
जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आधी जाहीर केल्यानुसार त्यांच्या वाढदिवसाला कोणत्याही जाहीर कार्यक्रमाचे आयोजन न करता फक्त सोशल मीडियातूनच शुभेच्छा स्वीकारल्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह राज्य व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी त्यांनी भ्रमणध्वनीवरून अभीष्टचिंतन केले, तर जिल्हाभरात त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध जनहितार्थ उपक्रम राबविण्यात आले. यात रक्तदान, वृक्षारोपण, जीवनावश्यक वस्तूंसह बियाण्यांचे वाटप आदी कार्यक्रमांचा समावेश होता. गुलाबरावजी फाउंडेशनतर्फे कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या जबाबदारीसाठी दात्यांनी सढळ हाताने सुमारे ११ लाखांची मदत फाउंडेशनला केली आहे. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम आठवडाभर चालणार आहेत.
पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षी कोरोनाच्या आपत्तीमुळे मंत्री पाटील यांनी वाढदिवस साजरा केला नव्हता, तर यंदादेखील वाढदिवस साजरा करण्यात येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. आपण फक्त फोनसह सोशल मीडियातूनच शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
या अनुषंगाने गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. त्यांनी जाहीर केलेल्या क्रमांकावर व्हॉट्स ॲप मेसेज, एसएमएस आणि कॉल यांच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, तर गुलाबराव पाटील यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, खा.विनायक राऊत, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार भावना गवळी, जळगावचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील बहुतांश सहकाऱ्यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले, तर एकनाथराव खडसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नेते व पदाधिकाऱ्यांनीही त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, वाढदिवसाचे औचित्य साधून गुलाबरावजी फाऊंडेशनने कोरोनामुळे अनाथ झालेल्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनामुळे अनाथ व निराधार झालेली मुले, विधवा झालेल्या महिला आदींना शासकीय योजनांच्या लाभासह गुलाबरावजी पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आवश्यक ती मदत केली जाणार आहे. यासाठी आज वाढदिवसाला फाउंडेशनकडे दात्यांनी सढळ हाताने सुमारे ११ लाख रुपयांची मदत केली आहे. या माध्यमातून लवकरच अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनतर्फे देण्यात आली.
पालकमंत्र्यांच्या वाढदिवसामुळे जिल्हाभरात विविध जनहितार्थ उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. यात पाळधीसह भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आदींसह अन्य ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. यात पाळधी आणि भुसावळ येथे झालेल्या रक्तदान शिबिरांमध्ये शंभरपेक्षा जास्त बॅग्जचे रक्त संकलन करण्यात आले. तर जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज रावसाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून चिंचोली, धानवड, उमाळे व कंडारी येथील गरीब व गरजू शेतकरी यांना कापूस, ज्वारी व तूर मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. जळगाव शहरात सागर पार्क मैदानावर महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. तर मेहरूण भागातील प्रभाग क्रमांक १५ येथे नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सेवाधर्म फाउंडेशननेही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
धरणगाव तालुक्यातही पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने चांदसर येथे १०० व पाळधी येथील कोविड केअर सेंटरमध्ये १०१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. धरणगाव येथे युवासेनेतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शिवसेनेतर्फे गोशाळेत पशुखाद्याच्या माध्यमातून अन्नदान आणि रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे अनेक लोककलावंतांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. या अनुषंगाने गोंधळी, वासुदेव, पोतराज, करपावली, तुतारी वादक, टिंगरी वादक, वहीगायन, शाहीर व तमाशा व वाघ्या मुरळी या कलावंत अशा सुमारे दीडशे गरजू कलावंतांना लवकरच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.