लोककलेच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:08 AM2021-01-24T04:08:13+5:302021-01-24T04:08:13+5:30
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे हा उपक्रम राबविला जात असून त्याचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील ...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे हा उपक्रम राबविला जात असून त्याचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
१२६ गावांमध्ये प्रजासत्ताक दिनापर्यंत प्रचार व प्रसिध्दी
लोककला आणि पथनाट्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनेतेपर्यंत पोहचवण्याचे प्रभावी माध्यम असून याचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केले. लोककला आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याऱ्या जिल्ह्यातील सात संस्थांचा शासनाच्या यादीत समावेश आहे. या संस्थांमार्फत जिल्ह्यातील १५ तालुक्यातील बाजारपेठेच्या व मोठ्या १२६ गावांमध्ये योजनांची २६ जानेवारीपर्यंत प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. दिशा समाज प्रबोधन बहुद्देशीय संस्थेच्या कलाकारांनी यावेळी लोककला सादर केली.