कुजबुज
२०१७ च्या आधी शहरातून जाणाऱ्या महामार्गाचा डीपीआर तयार झाला. त्यानंतर अधिकारी बदलले, तोपर्यंत जळगाव शहरातील आंदोलनकारी निद्रावस्थेत होते. ते सर्व तेव्हा सर्व्हिस रोडसाठी भांडत होते. २०१८ ला अधिकारी आले आणि कामाला सुरुवात झाली. कामाला सुरुवात झाल्यावर अनेक आंदोलनजीवींना लक्षात आले की ते जेथून रस्ता ओलांडतात तेथे अंडरपासच नाही. मग जोरात मागण्या सुरू झाल्या. सुरुवातीला काहींना हे महामार्गाचे कार्यालय कुठे, हे लक्षातच येईना, मग ते कार्यालय शोधले गेले. अधिकाऱ्यांशी वाद घातले गेले. एखाद्या भागातील नागरिकांनी गरजेनुसार आमच्या भागात अंडरपास द्या, अशी मागणी केली रे केली, की त्या आंदोलनजीवींना पुन्हा एकदा भरते येते, मग पुन्हा एकदा त्यांचा कार्यक्रम सुरू होतो आणि संबंधित अधिकारी मात्र डोक्याला हात लावून बसतात.
आकाश नेवे