यावल, जि.जळगाव : मातीपासून तयार होत असलेल्या लाल वीटभट्ट्यांना प्रतिबंध करण्याचा आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिल्याने पारंपरिक विटांचा व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजाने चिंता व्यक्त केली आहे. शासनाने हा निर्णय त्वरित बदलावा, अशी मागणी कुंभार समाजाने केली आहे.याबाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदार यांना देण्यात आले.भारत शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाकडून २५ फेब्रुवारी रोजी जारी झालेल्या अधिसूचना पत्रात मातीपासून तयार होणाºया लाल विटांना प्रतिबध करण्याचे सूचित केले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तयार करण्यात येत असलेल्या विटांमध्ये माती व राखेचे प्रमाण ५० टक्के असते आणि सिमेंट व राखमिश्रीत विटांपेक्षा या विटा अत्यंत मजबूत असून, नैसर्र्गिक आपत्तीमध्येही टिकाव धरतात. विटांमध्ये मातीबरोबर राखेचे ५० टक्के मिश्रण राहते. पूर्वीपेक्षा मातीचा वापर कमी झाला आहे. शासनाने अशा विटावर बंधणे आणल्यास कुंभार समाजाने उभारलेली यंत्रसामग्री वाया जाणार आहे. त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. समाजाच्या हा पारंपरिक व्यवसाय असून आहे. ८० टक्के समाज बांधव या व्यवसायात असल्याचे म्हटले आहे. त्यांचा चरितार्थ याच व्यवसायावर आहे. प्रतिबंध न उठल्यास त्यांच्यावर बेकारीची कुºहाड कोसळल.निवेदनावर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे, जिल्हा विट उद्योगाचे अध्यक्ष घनश्याम हरणकर, प्रदेशाध्यक्ष सुभाष पंडित, भीमराव पंडित, विजय पंडित, वसंत कापडे, विलास पंडित, राजेंद्र पंडित, भिकन पंडित, मधुकर पंडित, दिलीप पंडित, कैलास कापडे, वासुदेव कापडे, लीलाधर कापडे, रवींद्र कापडे संजय न्हावकर यांच्यासह अनेक समाज बांधवांच्या सह्या आहेत.
मातींच्या विटांवरील बंदी हटवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 6:09 PM
मातीपासून तयार होत असलेल्या लाल वीटभट्ट्यांना प्रतिबंध करण्याचा आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिल्याने पारंपरिक विटांचा व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजाने चिंता व्यक्त केली आहे. शासनाने हा निर्णय त्वरित बदलावा, अशी मागणी कुंभार समाजाने केली आहे.
ठळक मुद्देरावेर येथे कुंभार समाजाचे प्रशासनाला निवेदन८० टक्के समाज बांधव कुंभार व्यवसायात