लोंढ्री येथील केळी उत्पादक शेतकऱ्याचा माल मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:35 PM2020-04-08T17:35:46+5:302020-04-08T17:38:01+5:30
लोंढ्री येथील केळी उत्पादक शेतकऱ्याचा माल मातीमोल झाले आहे.
मनोज जोशी
पहूर, ता.जामनेर : लोंढ्री, ता.जामनेर येथील केळी उत्पादक शेतकºयांच्या काढणीला आलेल्या मालाकडे कोरोनामुळे व्यापाºयांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतातील झाडावर माल पिकून झाडे खाली पडत आहेत. केळीचे उत्पन्न मातीमोल झाल्याने केळी उत्पादक शेतकरी लाखांच्या आर्थिक संकटात आल्याचे भयावह चित्र आहे.
लोंढ्री येथील केळी उत्पादक शेतकरी भिला हंसराज चव्हाण याने व्याजाने पैसे काढून अडीच एकरात केळी पिकाची लागवड केली आहे. या पिकावर लागवड ते काढणीपर्यंतचा खर्च दोन ते अडीच लाखाच्या घरात गेला आहे. माल काढणीच्या अवस्थेत आला आहे. मात्र कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने माल घेण्यासाठी व्यापाºयांनी पाठ फिरवीली आहे. त्यामुळे झाडावरच केळी पिकून केळी मालाची गळण होत आहे व झाडेही खाली कोसळत असल्याने केळी उत्पन्न मातीमोल झाले आहे.