रावसाहेब भोसलेपारोळा, जि.जळगाव : कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी लागू केली आहे. पण याबाबत नागरिकांमध्ये गांभीर्य नाही. शहरासह ग्रामीण भागात नागरिकांनी विविध योजनांचे मानधन काढण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी करीत सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन झाल्याचे चित्र दिसत आहे.कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी विशिष्ट अंतरावर न उभे राहता बॅकांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. विशेष म्हणजे क्वचित लोकांनी मास्क घातलेले दिसत होते. शहरात असलेल्या बॅक परिसरात दररोज दोन तीन वेळा निर्जंतुकीकरण फवारणी करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी पालिकेकडे केली आहे.महामार्गावर, अमळनेर वसाहत परिसरात मोटार सायकलींवर तसेच टोळके बसलेले असतात. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी अनेक सुज्ञ नागरिकांनी केली आहे.बाजारातील गर्दी वाढबाजारपेठेत भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत चालली आहे. भाजीपाला वगैरे अत्यावश्यक सेवा ही दोन दिवसाआड दिली गेली पाहिजे. त्यामुळे रस्त्यावर किंवा बाजारात गर्दी होणार नाही.
पारोळ्यात बँकांमध्ये रांगाच रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:26 PM
शहरासह ग्रामीण भागात नागरिकांनी विविध योजनांचे मानधन काढण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी करीत सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन झाल्याचे चित्र दिसत आहे.
ठळक मुद्देसोशल डिस्टंसिंगचे उल्लंघनविविध योजनांचे मानधन काढण्यासाठी होतेय गर्दी