रेल्वेतील सेवानिवृत्त १०० वर्षीय कर्मचारी बापट यांचे मरणोत्तर देहदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 05:52 PM2020-12-27T17:52:04+5:302020-12-27T17:53:42+5:30
रेल्वेतील सेवानिवृत्त १०० वर्षीय कर्मचारी केशव बापट यांनी मरणोत्तर देहदान केले.
भुसावळ : मरणोत्तर आपले शरीर समाजाच्या कामी यावे या उदार उद्देशातून रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी केशव नरहर बापट यांनी देहदानाचा संकल्प केला होता. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांच्या कुटुंबीयांनी मरणोत्तर त्यांच्या शरीराचे दान केले.
केशव बापट (१००) हे लष्करातील सेवेनंतर रेल्वे गार्डचे कर्तव्य पार पाडून १९७८ला सेवानिवृत्त झाले होते.
वयाची शंभरी पूर्ण केल्यानंतर त्यांचा डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी सत्कार केला होता.
मरणोत्तर आपल्या शरीराचा समाजाला उपयोग व्हावा या उदार हेतूने बापट यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता. २६ रोजी पहाटे पाच वाजता त्यांचे निधन झाले. सकाळी दहा वाजता गोदावरी मेडिकल कॉलेजला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आपल्या त्यांचे शरीर देहदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते अभियंता सुरेश बापट यांचे वडील होत.