चाळीसगाव : देव जसा माणसात असतो, तसा दानवही असतो. गेल्या १९ महिन्यांपासून बेलगंगा साखर कारखाना सुरु करतांना हे वास्तव पदोपदी जाणवले. तथापि या देव शक्तीने दानवांवर विजय मिळविल्यानेच बॉयलर पेटू शकले. लोकसहभागातून बेलगंगा विकत घेण्यापासून ते सुरु करण्यापर्यंतचा असा भावनिक प्रवास उलगडतांना चेअरमन चित्रसेन पाटील यांनी कारखान्याची गाळप क्षमता येत्या तीन वर्षात दुप्पट करण्याची ग्वाही देखील दिली.सोमवारी सकाळी ११ वाजता बेलगंगा साखर कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळा विधीवत झाला. त्यावेळी चित्रसेन पाटील यांनी आपल्या मनोगतात हे शल्य जाहिरपणे व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, चाळीसगाव तालुक्यात एकेकाळी बेलगंगेसह कापड गिरणी, दूध व्यवसाय आणि आॅईल मिल सुरु होती. परंतु गेल्या वीस वर्षात हे औद्योगिक वैभव लयाला गेले. म्हणूनच दिड वर्षापूर्वी बेलगंगा कारखाना विकत घेण्यासाठी लोकसहभागाची मोट बांधली. त्यावेळी हे धाडस करु नका असा सल्ला अनेकांनी दिला होता. तालुक्यातील नैराश्य दूर करण्यासाठीच 'मिशन बेलगंगा' घेऊन पुढे निघालो. याकाळात पैसा उभा करण्यासाठी शेतक-यांच्या सभा घेतल्या. सर्वच घटकांना गुंतवणूकीचे आवाहन केले. याला मोठा प्रतिसाद मिळाला. कारखाना विकत घेण्यासाठी ४० कोटी रुपये लोकसहभागातून उभे राहिले. लोकसहभागातून साखर कारखान्यावर मालकी प्रस्थापित करण्याचा देशातील हा पहिलाच पथदर्शी प्रयोग असून बॉयलर पेटविण्यापर्यंत ६० कोटी रुपये खर्च झाले असून आणखी २० कोटी रुपये लागणार असल्याचेही चित्रसेन पाटील यांनी सांगितले.यावेळी उद्योगपती प्रविण पटेल, दिलीप चौधरी, प्रेमचंद खिंवसरा, माणकचंद लोढा, विजय अग्रवाल, दिनेश पटेल, अजय शुक्ला, यांच्यासह डॉ. अभिजीत पाटील, रवींद्र केदारसिंग पाटील, उद्धवराव महाजन, किरण देशमुख, विनायक वाघ, नीलेश निकम, राजेंद्र धामणे आदी उपस्थित होते. पारस जैन, कार्यकारी संचालक नामदेव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.गाळप क्षमता वाढविणारसद्यस्थितीत गिरणा परिसरात गाळपासाठी ऊस उपलब्ध आहे. कारखाना बंद पडल्याने ऊस लागवड करणा-या शेतक-यांनी अन्य पिकांचा पर्याय शोधला. आता कारखाना सुरु होत असल्याने एका गाळप हंगामात सव्वाशे कोटीचे चलन तालुक्याच्या अर्थव्यवस्थेत फिरणार आहे. ऊस हे शाश्वत हमी भाव देणारे पिक असून येत्या काळात ऊस लागवड वाढेल. कारखान्यात असणारी डिस्टेलरी सुरु केल्यावर ऊसाला चांगला भाव देणेही शक्य होणार असल्याने कारखान्याची गाळप क्षमता वाढवावी लागेल. सद्यस्थितीत दरदिवशी अडीच हजार मेट्रीक टन गाळप क्षमता असून येत्या तीन वर्षात ती दुप्पट म्हणजेच पाच हजार मेट्रीक टन करणार असल्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.साडेतीन हजार ऊसतोड मजुरांना आठ कोटी रुपये अदा करण्यात आले असून ३०० कामगारांची नव्याने भरती केली आहे. कारखान्याची उर्वरीत १८८ एकर जागा आहे. या जागेत तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन शेतकरी समृद्ध कसा होईल. याचेही नियोजन केले आहे. असेही चेअरमन पाटील यांनी स्पष्ट केले.सर्वपक्षीयांची उपस्थितीया बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळ्याला राष्ट्रवादीसह भाजपा व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. व्यापारी व शेतक-यांची उपस्थिती लक्षणीय होती. माजी नगराध्यक्षा लीलावती पाटील, बारामती येथील माळेगाव साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाश चव्हाण, भाजपाचे सुरेश स्वार, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य भूषण पाटील, बाजार समितीचे सभापती रवींद्र चुडामण पाटील, उपसभापती महेंद्र पाटील, माजी जि.प.सदस्य सुभाष चव्हाण, भीमराव खलाणे, राजेंद्र राठोड, भाजपा गटनेते राजेंद्र चौधरी, शिवसेनेचे नगरसेवक श्यामलाल कुमावत, राष्ट्रीय सह. शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. एम.बी.पाटील, सचिव अरुण निकम, राष्ट्रवादीचे दिनेश पाटील, भाजपाचे शेषराव पाटील, वसंतराव चंद्रात्रे, आदींची उपस्थिती होती.दानवांचे आव्हान स्विकारलेबेलगंगा हा तालुक्याचा अमृत कलश असून चार ते पाच 'दानवांनी' राजकारण म्हणून या चळवळीत अडथळे आणले. राजकारणात विरोध जरुर करा. मात्र कारखान्याच्या कामात विरोध करु नका. प्रस्थापितांनी त्रास दिला तरीही यशस्वी झालो. सातबा-यावर नाव न लागू देणे, कर्ज प्रकरणात हस्तक्षेप करणे, पुणे येथे क्रशिंगचा परवाना आणि आयएम क्रमांक मिळू नये म्हणूनही दानवांनी बाधा आणल्याचे सांगून कुणाचेही नाव न घेता चित्रसेन पाटील यांनी विरोधकांचा उल्लेख 'दानव' असा केला.
बेलगंगेची गाळप क्षमता तीन वर्षात दुप्पट करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:22 AM
दहा वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या बेलगंगा साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा सोमवारी मान्यवरांच्या उपस्थिती उत्साहात पार पडला. यावेळी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी कारखान्याची गाळप क्षमता तीन वर्षात दुप्पट करणार असल्याची ग्वाही दिली.
ठळक मुद्देदहा वर्षानंतर वाजला साखर कारखान्याचा भोंगागिरणा पट्ट्यात समाधानाचे वातावरण